नाशिक : मराठा आरक्षणसाठी आंदोलनाची घोषणा करणाऱ्या शिवसंग्राम संघटनेच्या नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची सोमवारी (दि. १४) नाशकात बैठक पार पडली. शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलनासाठी राज्यव्यापी जनजागृती दौरा करीत असून, ते नाशिकचाही दौरा करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन नियोजनाविषयी चर्चा केली.
नाशिकमधील बैठकीत शिवसंग्रामचे जिल्हाभरातील पदाधिकारी सहभागी झाले होते. लवकरच विनायक मेटे नाशिक दौऱ्यावर येणार असून, त्यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणासंदर्भात पुढील लढ्यातील नाशिक जिल्ह्याची दिशा ठरणार आहे. त्यामुळे या बैठकीच्या नियोजनावर सोमवारी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चर्चा केली. याबैठकीला नाशिक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शरद तुंगार, जिल्हा सरचिटणीस शाम खांडबहाले, युवक अध्यक्ष सुनील बोराडे, नाशिक उपजिल्हाध्यक्ष सचिन जाधव, शहर उपाध्यक्ष मच्छिंद्र कुरे, जयेश वाघ, अतीश जाधव, सचिन कोकणे, विकी दामोदर, विशाल कदम आदींसह शिवसंग्रामचे जिल्हा, शहर व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
===Photopath===
140621\14nsk_32_14062021_13.jpg
===Caption===
मराठा आरक्षणा संदर्भात शिवसंग्रामच्या बैठकीला उपस्थि पदाधिकारी व कार्यकर्ते