इगतपुरी तालुक्यात समृध्दी महामार्गाच्या कामासाठी खोदलेले मटेरियल वापरले जाते. कोनांबे ते जुना शिवडे रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. नवीन शिवडे - कोनांबे रस्त्यातील वळणे काढून रस्ता बनवावा. खराब झालेल्या रस्त्यांचे केवळ खड्डे भरून चालणार नाहीत, रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या हायवा जात असल्याने बीबीएम कारपेट करून घ्यावे, अशा सूचना आमदार कोकाटे यांनी केल्या. जिल्हा परिषदेंतर्गत येणारे १६ रस्ते खराब झाले आहेत. तथापि, पांढुर्ली - बोरखिंड रस्ता आणि आगासखिंड रस्ता बेलूजवळ २० मीटर भूसंपादनाचा प्रश्न प्रलंबित असून, भूसंपादन अधिकाऱ्यांनी हा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा. सिन्नर - घोटी रस्त्यावर समृध्दी महामार्गाचे क्रॉसिंग आहे. त्या ठिकाणी १ कि. मी. रस्त्यावर तत्काळ कारपेट करावे तसेच प्रत्येक समृध्दी क्रॉसिंगच्या ठिकाणी काँक्रीट करावे, अशा सूचनाही आमदार कोकाटे यांनी केल्या. मिठसागरे ते वावी रस्त्याचे जूनपर्यंत काम चालू राहणार आहे. त्यामुळे भोजापूर धरणातून माती काढून वापरण्यास त्यांनी सांगितले.
सिन्नरला समृध्दी महामार्गासंदर्भात बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 3:43 PM