विविध आघाडी प्रमुखांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:06 AM2019-06-21T01:06:25+5:302019-06-21T01:06:46+5:30

आगामी निवडणूक लक्षात घेता, पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने कॉँग्रेसच्या सर्व आघाडीच्या प्रमुखांनी येत्या आठ दिवसांत जिल्हा व शहर कार्यकारिणी जाहीर करावी, अशी सूचना जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी दिली.

A meeting of various lead leaders | विविध आघाडी प्रमुखांची बैठक

विविध आघाडी प्रमुखांची बैठक

googlenewsNext
ठळक मुद्देकॉँग्रेस : जिल्हा कार्यकारिणी तयार करण्याच्या केल्या सूचना

नाशिक : आगामी निवडणूक लक्षात घेता, पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने कॉँग्रेसच्या सर्व आघाडीच्या प्रमुखांनी येत्या आठ दिवसांत जिल्हा व शहर कार्यकारिणी जाहीर करावी, अशी सूचना जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी दिली.
गुरुवारी नाशिक जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीत जिल्हा काँग्रेस अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व फ्रंटल व विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीस माजी आमदार जयप्रकाश छाजेड व अनिल आहेर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तुषार शेवाळे यांनी, आज जरी आपण सत्तेत नसलो तरी येणारा काळ हा आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचा काळ असून, यासाठी प्रत्येक फ्रंटल प्रमुखाने आपली जिल्हा कार्यकारिणी येत्या ८ दिवसांत तयार करून जिल्हा कार्यालयात सादर करावी तसेच प्रत्येक फ्रंंटल प्रमुख व विभाग प्रमुखांच्या कार्यकारिणीसह स्वतंत्र बैठका घेऊन संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले. बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड यांनी तर आभार अनिल आहेर यांनी व्यक्त केले.
अल्पसंख्याकचे अध्यक्ष हनीफ बशीर यांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मुस्लीम समाजाच्या प्रत्येक सुख-दु:खात सहभागी होण्याचे आवाहन केले. अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी कार्यकारिणी तयार असून, नियुक्तीपत्र वाटप येत्या ८ ते १० दिवसात करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी किसान सेलचे स. का. पाटील, अनुसूचित जमातीचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र चौधरी, सेवादल शहर कार्याध्यक्ष लक्ष्मण धोत्रे, इंटक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कासार, अल्पसंख्याक महिला जिल्हाध्यक्ष समिना पठाण, पर्यावरण विभागाचे धर्मराज जोपळे, अनुसूचित जाती शहर अध्यक्ष किरण जाधव आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
संघटना उभी करताना येतात अडचणी
यावेळी सर्व फ्रंटल प्रमुखांनी आपली मते व्यक्त केली. एन.एस.यू.आय. अध्यक्ष नितीन काकड यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन व सहकार्य मिळावे तर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिनेश चोथवे यांनी तालुका कार्यकारिणी नसल्याकारणाने आणि संघटना उभी करताना अनेक अडचणी येतात, असे नमूद केले.

Web Title: A meeting of various lead leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.