दिंडोरी : यावर्षीपासून नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी ग्रामीण भागातील गणेश मंडळासाठी विघ्नहर्ता बक्षीस योजना आयोजित केली असून, पोलीस स्टेशन बीट, विभाग व जिल्हास्तर यानुसार समिती स्थापन केली असून, प्रत्येक विभागात पाच बक्षिसे दिली जाणार आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाल्हास्तरीय विघ्नहर्ता परीक्षण समितीचे अध्यक्ष अप्पर पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड, समन्वयक अधिकारी उपविभागीय अधिकारी देवीदास पाटील, सहाय्यक अधिकारी खंडेराव रंजवे, परीक्षण समिती सदस्य डॉ. विकास देव, श्रीम. सूर्यवंशी, संतोष कथार सर, विलास जमदाडे सर, नितीन गायकर, नानासाहेब मंडलिक, डॉ. शिरोळे, प्रा. उमेश कुलकर्णी, निकिता बावा, डॉ.वसंत ढिकले, तौसिफ मणियार आदींची बैठक संपन्न झाली. यावेळी बक्षीस योजना व गुणदान याविषयी चर्चा करण्यात आली.पोलीस स्टेशनअंतर्गत पाच मंडळाची निवड केलेले मंडळे यांची विभागात पाच मंडळे निवडली जातील आणि जिल्ह्यातील विभागाने निवडलेल्या मंडळातून पाच मंडळांची निवड ही जिल्हा समिती गुणदान करून निवडणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी दिली.
विघ्नहर्ता बक्षीस योजना परीक्षण समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 1:02 AM
दिंडोरी : यावर्षीपासून नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी ग्रामीण भागातील गणेश मंडळासाठी विघ्नहर्ता बक्षीस योजना आयोजित केली असून, पोलीस स्टेशन बीट, विभाग व जिल्हास्तर यानुसार समिती स्थापन केली असून, प्रत्येक विभागात पाच बक्षिसे दिली जाणार आहे.
ठळक मुद्देबक्षीस योजना व गुणदान याविषयी चर्चा