नाशिक : पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेत मेगा भरतीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यात पहिल्या टप्प्यात सध्या कंत्राटी आणि मानधनावर असलेल्यांना संधी देण्याच्या दृष्टीने विचार केला जात आहे. त्यानंतर रिक्तपदासाठी थेट भरती राबविण्याची तयारी राजकीय स्तरावर सुरू आहे. महापालिकेने यापूर्वी शासनाकडे आकृतिबंध सादर केला असून, त्यात अनेक रिक्तपदे दाखविण्यात आली आहेत; मात्र हा आकृतिबंध अद्याप मंजूर नाही. महापालिकेत सध्या घंटागाडी कामगार, अंगणवाडी सेविका तसेच पेस्ट कंट्रोल आणि अन्य अनेक कर्मचारी कंत्राटी पद्धतीने किंवा मानधनावर काम करीत आहेत. सध्या मानधन किंवा कंत्राटी पद्धतीने काम करणाºया सुमारे हजार कर्मचाºयांना कायम केल्यास त्याचा निवडणुकीत मोठा लाभ होईल, असे भाजपाचे गणित आहे. एक हजार पदे भरता आल्यास युवकांना रोजगार दिल्याचा दावादेखील करता येणार आहे.महापालिकेचे यापूर्वीचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या अगोदर आयुक्तांनी सादर केलेल्या आकृतिबंधाविषयी प्रतिकूल मत व्यक्त केले होते. त्यामुळे भरतीच्या विचारांनाच खीळ बसली होती; मात्र आता आयुक्त बदलल्यानंतर गमे हे महापालिकेतील आणि राज्यातील सत्तारूढ पक्षाला अनुकूल निर्णय घेतील अशी भाजपाला खात्री वाटत आहे, त्यामुळेच मेगा भरतीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
महापालिकेत मेगा भरतीच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:17 AM