शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

रविवारी नाशकातील प्रमुख रस्त्यांवर ‘मेगाब्लॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 3:12 PM

नाशिक मॅरेथॉन पाच गटात होणार असून, त्यात तीन किलो मीटर, पाच, दहा, २१ व ४२ किलो मीटरचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक गटासाठी काही रस्त्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. रविवारी पहाटे चार ते दुपारी बारा वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक राहणार आहे. त्यात प्रामुख्याने त्र्यंबकरोड, महात्मानगर, सीबीएस. अशोकस्तंभ, गंगापूररोड,

ठळक मुद्देपोलीस मॅरेथॉन : आठ तास पर्यायी मार्गांवर वाहतूक कोंडीपेपर विक्रेते, दूधवाल्यांची पायपीट होणार

नाशिक : नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे रविवारी आयोजीत करण्यात आलेल्या नाशिक मॅरेथॉन स्पर्धेसाठी शहरातील प्रमुख मार्ग तब्बल आठ तास सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याची अधिसुचना पोलीस आयुक्तालयाने जारी केली असून, शहरांतर्गंत वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. वाहतुकीसाठी बंद राहणारे मार्ग शहरातील मध्यवस्तीत असल्यामुळे पेपर विक्रेते, दूधवाल्यांची पायपीट होणार असून, पर्यायी मार्गांवरही वाहतुक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.नाशिक मॅरेथॉन पाच गटात होणार असून, त्यात तीन किलो मीटर, पाच, दहा, २१ व ४२ किलो मीटरचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक गटासाठी काही रस्त्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. रविवारी पहाटे चार ते दुपारी बारा वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक राहणार आहे. त्यात प्रामुख्याने त्र्यंबकरोड, महात्मानगर, सीबीएस. अशोकस्तंभ, गंगापूररोड, टिळकवाडी, शरणपुररोड, जुना गंगापुरनाका, जेहान सर्कल, एबीबी सर्कल, आयटीआय सर्कल, पपया नर्सरी, पिंपळगाव बहुला, हॉटेल संस्कृती आदी रस्त्यांचा समावेश आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाºयांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या प्रमुख मार्गावरील वाहतुक अन्य मार्गावरून वळविल्यामुळे पर्यायाने या मार्गांवर नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे.चौकट====असे आहेत पर्यायी मार्ग* भवानी सर्कल (मायको सर्कल) ते त्र्यंबक नाका (मोडक सिग्नल) या मार्गावरील वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात आल्याने नागरिकांनी गडकरी सिग्नल ते चांडक सर्कल ते मायको सर्कल या पर्यायी मार्गाचा वापर करावा.* त्र्यंबक नाका (मोडक सिग्नल) ते अशोक स्तंभ ते जेहान सर्कल ते एबीबी सर्कलकडे जाणा-या रस्त्यांच्या डाव्याबाजुकडील लेनवर मॅरेथॉनचे स्पर्धक धावणार असल्याने सदर लेन वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी रस्त्याच्या उजव्या लेनचा वापर येण्या-जाण्यासाठी करावा.* एबीबी सर्कल ते पपया नर्सरी ते हॉटेल संस्कृतीकडे जाणा-या रस्त्यांच्या डाव्या बाजुचा वापर हा येणा-या जाणा-या वाहनांनी करावयाचा आहे. हॉटेल संस्कृती ते पपया नर्सरी ते एबीबी सर्कल ते सिब्बल हॉटेल ते भवानी सर्कल ते गोल्फ क्लबकडे येणा-या डाव्या बाजुकडील लेनवर स्पर्धक धावणार असल्याने सदरची लेन वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद असणार आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक