शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

मेहेर, भवानी सर्कल वाहतूक मार्गात बदल

By admin | Published: December 22, 2016 12:02 AM

वारंवार अपघात : वाहतुकीचा ताण कमी करणार

नाशिक : सर्वाधिक वर्दळीच्या मेहेर व भवानी सर्कल परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शहर वाहतूक शाखेने या मार्गात बदल करण्यात आल्याची अधिसूचना पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे यांनी प्रसिद्धीस दिली आहे़   मेहेर सिग्नल, गोळे कॉलनी परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत असल्याने येथील वाहतूक मार्गातही बदल करण्यात आले आहेत़ त्यात मेहेर हॉटेलजवळील एलआयसी कार्यालयाकडे जाणारा मार्ग वाहनचालकांसाठी बंद करण्यात आला असून मेहेर सिग्नलच्या बाजूने बिझनेस बँकेकडून गोळे कॉलनीत जाणारा रस्ता हा एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तर गोळे कॉलनीकडून बिझनेस बँकेजवळून मेहेरकडे जाणाऱ्या वाहतुकीस प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गोळे कॉलनीतून बाहेर जाण्यासाठी गद्रे मंगल कार्यालयाकडून किंवा सारस्वत बँकेसमोरील रस्त्याचा वापर करून वाहनचालकांना गंगापूररोडच्या दिशेने जाता येईल़मेहेर सर्कलप्रमाणेच भवानी सर्कल परिसरात येणारा मोडक सिग्नल, चांडक सर्कल, उंटवाडी, त्र्यंबकेश्वरकडून येणारी वाहतूक तसेच होलाराम कॉलनीकडून येणाऱ्या वाहतुकीचा ताण येतो व अपघातही घडतात़ त्यामुळे त्र्यंबकरोडवरील जुना सीटीबी सिग्नलकडून होलाराम कॉलनीत जाण्यासाठी वाहन चालकांना डावे वळण घेऊन जाण्यास वाहतूक शाखेने परवानगी दिली   आहे.  मात्र, जलतरण तलाव, चांडक सर्कल, उंटवाडी रोडकडून येणाऱ्या वाहनचालकांना भवानी सर्कलवरून विरुद्ध मार्गाने प्रवेश बंद करण्यात आला आहे. वाहनचालकांना जुन्या सीटीबी सिग्नलकडून पुन्हा होलाराम कॉलनीकडे जाण्याची मुभा देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)