देवळाली कॅम्प : संचालकांमधील मतभेद, तसेच कारखाना सुरू करण्यासंदर्भात असलेली उदासीनता यामुळे चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू झाला पाहिजे, अशी मागणी करत सभासदांनी संचालकांना अनेक प्रश्न विचारून हैराण केले.नाशिक सहकारी साखर कारखान्याची ४४वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाली. अध्यक्षस्थानी मुख्य प्राधिकृत अधिकारी बी. एस. बडाख होते. यावेळी कारखाना सभासदांनी कारखाना सुरू झाला पाहिजे, अशी मागणी करत हाच विषय प्राध्यान्याने चर्चेला घेण्याची मागणी केली. यावेळी माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी एनपीएमध्ये गेलेल्या संस्थांना व्याजाची आकारणी केली जात नाही असे असतानाही कारखान्याला जिल्हा बँकेकडून व्याजाचा भुर्दंड आकारला जात असल्याने कारखाना अडचणीत आल्याचे विधान केले. कारखाना सुरू होण्यासाठी आपण स्वत: केंद्रीय अर्थमंत्र्यांना भेटलो असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा बँक व कारखाना प्रशासक मंडळाने योग्य तो प्रस्ताव सादर करून कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे पिंगळे म्हणाले.कारखाना वाचविण्यासाठी खासदार हेमंत गोडसे व खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासह आपण प्रयत्न केले असून, नाबार्डला पत्र पाठविले असल्याचे पिंगळे म्हणाले. (वार्ताहर)
सभासद आक्रम
By admin | Published: September 20, 2015 11:54 PM