मुंबई आग्रा महामार्गावरील घोटी शहरात वेताळमाथा खिंड ते खंबाळे आश्रमशाळा या दरम्यान उड्डाणपूल होत असून, या पुलाच्या प्राथमिक व पर्यायी उपाय योजनांच्या कामाला सुरुवात झाली आहे. सिन्नर चौफुली व वैतरणा फाटा येथे सर्विस रोड असणार आहे; मात्र हा पूल कॉलमवर आधारित नसून, भरावाचा आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक व व्यावसायिक धास्तावले आहेत.
भरावावर आधारित उड्डाणपूल झाल्यास शहराचे विभाजन होऊन शहराच्या विकासाला बाधा येईल, दळणवळणाला अडथळे येतील, तसेच या परिसरातील व्यावसायिकांचे रोजगार नष्ट होऊन बेरोजगारी वाढणार असल्याने येथील व्यावसायिक धास्तावले आहेत. त्यामुळे हा उड्डाणपूल भरावाचा न करता कॉलमवर आधारित व्हावा, अशी मागणी या निवेदनात नमूद करण्यात आली आहे. यावेळी रिपाइंचे तालुकाध्यक्ष सुनील रोकडे, दत्तात्रय वाघ, अशोक काळे, मुरलीधर डहाळे, गणेश घोटकर आदी उपस्थित होते.
फोटो- ०८घोटी आठवले
घोटी येथील उड्डाणपुलासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना निवेदन देताना संतोष रौंदळ, मंगेश रोकडे, शिवराम झाेले, संपतराव काळे आदी.
===Photopath===
080121\08nsk_16_08012021_13.jpg
===Caption===
घोटी येथील उड्डाणपुलासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना निवेदन देताना संतोष रौंदळ, मंगेश रोकडे, शिवराम झाेले, संपतराव काळे आदी.