शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

‘बिरोबाच्या ठाण्या’त जागविल्या वीरपुत्र सचिन यांच्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 11:10 PM

मला फोन करू नका, मी रेंजमध्ये नाही, असे सुमारे महिनाभरापूर्वी व भ्रमणध्वनी-वरून बोलणे झालेल्या येथील सचिन मोरे यांना वीरमरण आले अन् ‘रेंज’ नसल्याने महिनाभरापूर्वीचा ‘संवाद’ केवळ आठवण म्हणून ठेवून गेला. संपूर्ण मोरे वस्तीवर आज दिवसभर गाव गोळा झाला. कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी वीरपुत्राच्या आठवणी जागवित आपल्या भावनांना वाट करून दिली. आता वीरपुत्राच्या अंतिम दर्शनासाठी सर्वांचे डोळे त्याच्या कलेवराच्या आगमनाकडे लागले आहेत.

ठळक मुद्देसाकुरी गाव सुन्न : अंतिम दर्शनासाठी सर्वांच्या लागल्या नजरा

शफिक शेख ।साकुरी झाप, ता. मालेगाव : मला फोन करू नका, मी रेंजमध्ये नाही, असे सुमारे महिनाभरापूर्वी व भ्रमणध्वनी-वरून बोलणे झालेल्या येथील सचिन मोरे यांना वीरमरण आले अन् ‘रेंज’ नसल्याने महिनाभरापूर्वीचा ‘संवाद’ केवळ आठवण म्हणून ठेवून गेला. संपूर्ण मोरे वस्तीवर आज दिवसभर गाव गोळा झाला. कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी वीरपुत्राच्या आठवणी जागवित आपल्या भावनांना वाट करून दिली. आता वीरपुत्राच्या अंतिम दर्शनासाठी सर्वांचे डोळे त्याच्या कलेवराच्या आगमनाकडे लागले आहेत.वीर जवान सचिन मोरे जानेवारी महिन्यात साकुरी झाप येथे आपल्या गावी सुटीत आले होते. महिनाभर घरी आई-वडील, भावंड, पत्नी, मुले यांचा सहवास अखेरचाच ठरला. लडाखला बदली झाली आहे. तेथे ‘रेंज’ची समस्या आहे. मला फोन करू नका, ‘रेंज’ मिळणार नाही, असे सांगितल्याचे त्याचे वडील विक्रम मोरे यांनी सांगितले.मालेगाव तालुक्याच्या सीमेवरील शेवटचे गाव आणि ‘बिरोबा’चे ठाणे म्हणून प्रसिद्ध असलेल्या साकुरी झाप गावात मोरे वस्ती आहे. वस्तीत शेतात बांधलेल्या घरालगत आज दिवसभर तालुका भरातील लोकांची ‘रिघ’ लागली होती. शेतातच छोटा मंडप टाकून सांत्वनासाठी आलेल्या लोकांना सचिनचे वडील विक्रम मोरे भेटत आहेत.देशासाठी मुलगा शहीद झाल्याचा अभिमान तर आहेच; पण आज वीर-जवानाच्या दर्शनासाठी झालेल्या गर्दीमुळे ‘ऊर’ आणखी दाटून आल्याचे विक्रम मोरे यांनी सांगितले.वीरजवान मोरे यांची पत्नी सारिका माहेरी वाजगाव खर्डे येथे राहत होत्या. मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी तेथून जवळच असलेल्या भाबडबारीनजीक शाळेत टाकले आहे. बुधवारी रात्रीच त्यांच्या मोबाइलवर सचिनला ‘वीरगती’ प्राप्त झाल्याचे कळविण्यात आले होते. मात्र पत्नी सारिका यांना सकाळी साडेआठ ते नऊ वाजेदरम्यान माहेरच्या घरातील लोकांनी हा निरोप दिला. त्यानंतर सासरी साकुरी झाप येथे सासरच्या लोकांना ही माहिती कळविण्यात आली. दोन मुली आणि लहान कार्तिकला घेऊन पत्नी सारिका या सासरी आल्या आणि एकच हंबरडा फोडला. अनावर झालेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

टॅग्स :SoldierसैनिकDeathमृत्यू