चांदवड : बंदवर तोडगा निघेना; निर्णयावर ठामचांदवड : महाराष्ट्र शासनाने दि. ५ जुलै २०१६ रोजी काढलेल्या अध्यादेशाप्रमाणे येथील बाजार समितीच्या सर्व अडते व व्यापारी, खरेदीदारांनी आपले परवाने (लायसन्स) चांदवड बाजार समितीत जमा केले. यानंतर व्यापारी, खरेदीदार व बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांची बैठक झाली. मात्र व्यापारी निर्णयावर ठाम असल्याने अखेर तोडगा निघू शकला नाही. बाजार समितीने लिलावात भाग घ्यावा अन्यथा बाजार समितीचे प्लॉट खाली करावे, अशी कारणे दाखवा नोटीस व्यापाऱ्यांना दिल्याने तुम्ही काय आम्हाला जागा खाली करण्यास भाग पाडता आम्हीच परवाने जमा करतो, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली.यावेळी निवेदनावर व झालेल्या बैठकीस कृउबाचे संचालक चंद्रकांत व्यवहारे, प्रवीण हेडा, भूषण पलोड, पारस डुंगरवाल, सुशील पलोड, दीपक हेडा, अविनाश व्यवहारे, अंकुर कासलीवाल, अनिल हेडा, राजेंद्र व्यवहारे, सचिन अग्रवाल, अक्रम शेख, यास्मीन शेख, शिवाजी कोतवाल, शरद कोतवाल, आदित्य फलके, मुस्ताक शेख, नूरमोहमंद तांबोळी, उमेश आसावा, संदीप राऊत, भानुदास खैरे, राजेंद्र अजमेरा, हेमंत सोनवणे, गणेश वारघ आदिंसह चांदवड येथील सुमारे ११७ व्यापारी उपस्थित होते. (वार्ताहर)
व्यापाऱ्यांकडून परवाने बाजार समितीत जमा
By admin | Published: July 17, 2016 1:12 AM