लोकमतच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित लोकमत संवाद उपक्रमात मंडलेचा आणि चेंबरच्या प्रतिनिधींनी विविध विषयांवर मते मांडली. या उपक्रमात सचिन शहा, दीपाली चांडक, सुरेश चावला आणि मिलिंद राजपूत आदी कार्यकारिणी सदस्य सहभागी झाले होते. लोकमतचे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी आणि सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी त्यांचे स्वागत केले.
कोरोनामुळे व्यापारी वर्ग अडचणीत आला आहे. सतत बंद बाजारपेठा, त्यात शासकीय - स्थानिक संस्थांचे कर यांचा भार आहे. बँकेच्या व्याजाचा भार तर अधिक आहे. बँका एक प्रकारे व्यापाऱ्यांच्या दाेनतृतीयांश भागीदार आहेत. या सर्व परिस्थितीतून सावरण्यासाठी लवकरच कोणत्याही कामाची दूरदृष्टी असलेल्या केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्यात येणार आहे. केंद्र शासनाने वेगवेगळ्या देशांतील वित्तीय संस्था किंवा अन्य मार्गाने कर्ज घेऊन बँकांकडून चार ते पाच टक्के अशा अल्पदराने व्यापाऱ्यांना उपलब्ध झाले पाहिजे, असे मंडलेचा यावेळी म्हणाले. यावेळी दीपाली चांडक यांनी व्यापाऱ्यांबरोबरच लघु आणि मध्यम उद्याेगांनाही अल्प व्याजदरात कर्ज मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली, तर सचिन शहा यांनी देखील बांधकाम व्यवसायाला उभारी मिळावी यासाठी विविध सूचना केल्या. सुरेश चावला यांनी दिल्लीच्या धर्तीवर नाशिकमध्ये ऑटो एक्पो भरवण्याचा चेंबरचा मनोदय असल्याचे सांगितले तर मिलिंद राजपूत यांनी नाशिकच्या उद्योजकांच्या अपेक्षा व्यक्त केला.
इन्फो..
कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी चेंबरकडून प्रयत्न होत आहेत. गेल्या वर्षी मार्च महिन्यात दुबईत राज्यातील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ देखील नेण्यात आले होते. त्यामुळे तेथे स्पर्धा करताना माल कशा पद्धतीने पाठवला पाहिजे, वेष्टन काय असले पाहिजे याबाबत देखील माहिती मिळाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यानुसार माल पाठवण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती मंडलेचा यांनी दिली.
इन्फो..
नाशिकमध्ये स्टेडियम अपार्टमेंट रुजावी
नाशिकमध्ये कृषी आधारित उद्योग सुरू करण्यासाठी एमआयडीसीने पुढाकार घेऊन शेड उपलब्ध करून द्यावेत, अशी सूचना संतोष मंडलेचा यांनी दिली. सध्या कोरोनामुळे मुंबई, पुण्यातील काॅर्पोरेट ऑफिसमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होममुळे घरी जावे लागले आहे; परंतु घरातून कामे करण्यास अनेक अडचणी येत असल्याने नाशिकमध्ये निसर्गरम्य ठिकाणी स्टेडियम अपार्टमेंटसारखी योजना आखली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
-------------
छायाचित्र क्रमांक २६ पीएचजेयु ९९