शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
3
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
4
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
5
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
6
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
7
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
9
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
10
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
11
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
12
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
13
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
14
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
15
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
16
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
17
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
18
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
19
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...

पारा १०.३ अंशावर : राज्यात सर्वाधिक थंडीचा कडाका नाशकात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 8:10 PM

शनिवारी किमान तापमानाचा पारा ११.२ अंशापर्यंत खाली आला होता. त्यानंतर मंगळवारी १२.२ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले; मात्र बुधवारी अचानकपणे पारा थेट १०.३ अंशापर्यंत खाली घसरला.

ठळक मुद्देथंडीच्या कडाक्यात वाढ होऊन पारा १० अंशापर्यंत खाली बुधवारी पहाटेच्या सुमारास कडाक्याची थंडी

नाशिक : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी (दि.१) थंडीच्या चालू हंगामातील सर्वाधिक कडाक्याची थंडी नाशिककरांनी अनुभवली. या हंगामातील सर्वाधिक निचांकी १०.३ अंशापर्यंत पारा घसरला. यामुळे नाशिक हे राज्यात सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून नोंदविले गेले. पहाटेपासून नाशिककरांना हुडहुडी भरली होती. तसेच दिवसभर नाशिककरांनी उबदार कपडे परिधान करण्यास पसंती दिली.शहराचा किमान तापमानाचा पारा घसरत असून नागरिकांना बोचऱ्या थंडीचा अनुभव मागील शनिवारपासून येऊ लागला आहे. शनिवारी किमान तापमानाचा पारा ११.२ अंशापर्यंत खाली आला होता. त्यानंतर मंगळवारी १२.२ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले; मात्र बुधवारी अचानकपणे पारा थेट १०.३ अंशापर्यंत खाली घसरला. यामुळे नाशिककरांना थंडीची तीव्रता अधिकच अनुभवयास आली. शनिवारपासून शहरात थंडीचा कडाका कायम आहे आहे. थंडीच्या कडाक्यात वाढ होऊन पारा १० अंशापर्यंत खाली आल्याने नाशिककर गारठले. मंगळवारी रात्री अधिक वेगाने थंड वारे वाहण्यास सुरूवात झाली. यामुळे बुधवारी पहाटेच्या सुमारास कडाक्याची थंडी शहरात पडली. दिवसभर लख्ख सुर्यप्रकाश असतानाही वातावरणात गारठा जाणवत होता.उत्तरेकडून येणा-या शीतलहरीमुळे शहराच्या किमान तापमानाचा पारा घसरू लागला आहे. नव्या वर्षाचा पहिल्या आठवड्यात थंडीची तीव्रता अधिक वाढण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. जम्मू-काश्मिरमध्ये बफवृष्टी जोरदार सुरू असून तेथील धबधबेदेखील गोठले गेले असून किमान तापमान उणे झाले आहे. यामुळे उत्तर भारत गारठला आहे. परिणामी या वातावरणाचा परिणाम उत्तर महाराष्टÑासह विदर्भ, मराठवाड्यावरही होऊ लागला आहे.आरोग्यावर परिणामथंडीचा कडाका वाढताच बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना पहावयास मिळत आहे. बहुतांश नागरिकांना सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवू लागला आहे. पाणी उकळून पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून रुग्णांना दिला जात आहे. तसेच थंड गुणधर्माची फळे तसेच अन्य पदार्थ खाणे टाळावे, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे. पहाटे तसेच रात्री घराबाहेर पडताना नाका-तोंडावर रुमाल किंवा उबदार कापड व डोक्यावरदेखील टोपी परिधान करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.या शहरांमध्ये थंडीचा कडाका (किमान तापमान)महाबळेश्वर- १०.६चंद्रपूर- १०.६पुणे - १०.८सातारा-१२.१नागपूर- १३.४नाशिक जिल्ह्यातील किमान तापमानशहर : १०.३निफाड : ९इगतपुरी : ९सिन्नर : १०मालेगाव : ११

टॅग्स :NashikनाशिकweatherहवामानTemperatureतापमानWinter Care Tipsथंडीत त्वचेची काळजी