शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

पारा थेट शून्यावर! काश्मीरमधील थंडीचा अनुभव घ्यायचाय तर चला नाशिकला

By अझहर शेख | Published: December 30, 2018 10:27 PM

तीन दिवसांपूर्वीच निफाडमध्ये १.८ अंश इतकी नीचांकी नोंद झाली होती. जिल्ह्यातील निफाड तालुक्यात थंडीने हाहाकार उडविला आहे. निफाड तालुक्यातील गोदाकाठ थंडीने थरारला आहे. येथील द्राक्षमळ्यांमध्ये अक्षरश: शेकोट्या शेतक-यांनी पेटविल्या आहे.

ठळक मुद्देउत्तरेकडून येणाऱ्या थंड लाटेचा परिणाम उगावमध्ये पारा शून्यावर द्राक्षमळ्यावरदेखील आच्छादन टाकण्यात आले आहेदवबिंदूचा बर्फ होऊन जमिनीवर पडत आहे.

नाशिक : निफाड तालुक्याला राज्याचे काश्मीर म्हटले तर वावगे होणार नाही. कारण मागील दहा दिवसांपासून सातत्याने किमान तापमानाचा पारा कमालीचा घसरत आहे. निफाडमध्ये रविवारी कुंदेवाडी कृषी केंद्रात २.८ अंश तापमान मोजले गेले, तर उगावमध्ये पारा शून्यावर तसेच ओझरमध्ये थेट ०.९ आणि कसबे-सुकेणे येथे १ अंशापर्यंत तापमान खाली घसरल्याची नोंद हवामान केंद्रककडून करण्यात आली आहे.जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशासह उत्तरेकडील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होत आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड लाटेचा परिणाम नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्र व विदर्भावर अधिक झाला आहे. किमान तापमानाचा पारा वेगाने घसरू लागल्याने निफाड गोठले आहे. तीन दिवसांपूर्वीच निफाडमध्ये १.८ अंश इतकी नीचांकी नोंद झाली होती. जिल्ह्यातील निफाड तालुक्यात थंडीने हाहाकार उडविला आहे. निफाड तालुक्यातील गोदाकाठ थंडीने थरारला आहे. येथील द्राक्षमळ्यांमध्ये अक्षरक्ष: शेकोट्या शेतक-यांनी पेटविल्या असून, जागोजागी नागरिकदेखील उसाचे चिपाडे पेटवून शेकोटीद्वारे थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. निफाडमधील नांदूरमधमेश्वर अभयारण्यापासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या उगावमध्ये पारा थेट शून्यावर घसरल्याने तेथे पाण्याचा बर्फ झाल्याचा अनुभव नागरिकांना रविवारी सकाळी आला. तसेच ओझर येथे ०.९ अंश इतक्या किमान तापमानाची नोंद झाली तर कसबे-सुकेणे येथे पारा १ अंशापर्यंत घसरला. कुंदेवाडी कृषी संशोधन केंद्रात मात्र सकाळी २.८ अंश इतके तापमान नोंदविले गेले.द्राक्षांचा हंगाम धोक्यातनिफाड तालुक्यात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद सातत्याने होत आहे. नागपूरमध्ये रविवारी ४ अंशांपर्यंत जरी पारा घसरला असला तरी निफाडमध्ये कृषी संशोधन केंद्रात २.८ अंशांपर्यंत घसरल्याने राज्यात सर्वाधिक थंडीचा कडाका नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात आहे. यामुळे निफाड या बागायती तालुक्यातील द्राक्षबागा धोक्यात आल्या आहेत. द्राक्षबागांमध्ये अक्षरक्ष: शेतकºयांना शेकोट्या पेटवाव्या लागत आहेत. तसेच द्राक्षमळ्यावरदेखील आच्छादन टाकण्यात आले आहे. दवबिंदूचा बर्फ होऊन जमिनीवर पडत आहे. चापडगाव, खानगावथडी, तारुखेडले, कसबे सुकेणे आदी गावांमध्ये दवबिंदू गोठल्याचे चित्र पहावयास मिळाले

टॅग्स :NashikनाशिकTemperatureतापमानweatherहवामान