महाराष्ट्र शासनाकडून कामगारांना गुणवंत कामगार पुरस्कार त्यांच्या कामासह सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, कला, क्रीडा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याचा विचार लक्षात घेऊन देण्यात येतो. राज्यातून ५१ कामगारांना सदर पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. सदरचा पुरस्कार सिन्नरच्या दोन कामगारांना मिळाल्याने सिन्नरच्या औद्योगिक क्षेत्रात समाधान व्यक्त केले जात आहे.
तांबोळी व भोरकडे यांना कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील व राज्यमंत्री बच्चू कडू व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सपत्नीक गौरविण्यात आले. यावेळी पुरस्कारार्थीला सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व २५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. सिन्नरच्या औद्योगिक क्षेत्रातील कामगारांनी त्यांच्या वैयक्तिक कामासह सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करुन पुरस्कार मिळवून सिन्नरचा नावलौकिक वाढवावा अशी अपेक्षा तांबोळी व भोरकडे यांनी व्यक्त केली.
फोटो - १७ सिन्नर कामगार
सिन्नरचे कामगार गणेश तांबोळी यांना कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सपत्नीक गौरविण्यात आले. त्याप्रसंगी बच्चू कडू व श्रीमती सिंघन.
===Photopath===
170221\17nsk_12_17022021_13.jpg
===Caption===
सिन्नर: गणेश तांबोळी व बाबासाहेब भोरकडे यांचा गौरव