नायगाव : सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा शिबिराच्या माध्यमातून बंधाऱ्यांच्या बांधणीबरोबर पथनाट्याद्वारे बेटी बचावचा नारा दिला. सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती भगवान पथवे यांच्या हस्ते करण्यात आले.धनलक्ष्मी शिक्षण संस्थेचे संस्थापक शिवाजी कातकाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्र मास पंचायत समिती सदस्य संग्राम कातकाडे, सरपंच विनता कापडी, उपसरपंच सुभाष बर्के, चिंधू डोमाडे, धनलक्ष्मी शिक्षण संस्थेचे सरचिटणीस कुणाल कातकाडे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. के.व्ही. रेड्डी, कॉलन आॅफ फार्मसी विद्यालयाचे डॉ. सी.जे. भंगाळे, यादव कापडी आदी प्रमुख उपस्थित होते.शिबिरात तीनही विद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी देशवंडी येथील लोककवी वामनदादा कर्डक स्मारक परिसरात स्वच्छता केली. शिवारात जलसंधारण योजनेसारखे अनेक मातीचे बंधारे श्रमदानातून तयार केले. तसेच बेटी बचाओ, बेटी पढावो, अंधश्रद्धा आदी विषयांवरनाटिका सादर करून ग्रामस्थांचे प्रबोधन केले.या शिबिरात एस.एस.के. विद्यालय नायगाव, सर विश्वेश्वरय्या विद्यालय व औषधनिर्माण शाखा पदवी महाविद्यालय चिंचोली आदी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्रमदान केले. यावेळी धनलक्ष्मी शिक्षण संस्थेचे सरचिटणीस कुणाल कातकाडे, प्रा. शरदचंद्र कार्ले, विकास कुंदे, जानकी नाठे, कावेरी वाडीटाके आदींसह विद्यार्थी व स्वयंसेवक उपस्थित होते.
पथनाट्याद्वारे ‘बेटी बचाव’चा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 6:17 PM