नाशिक : माणसाने आपल्या जीवनशैलीत बदल करीत क्लोरोफ्लोरो कार्बनचा वापर अधिकाधिक कमी करावा, त्यासाठी वातानुकूलित यंत्रांचा मोह सोडावा आणि पृथ्वीवरून वातावरणात उत्सर्जित होणाºया व ओझोनच्या सुरक्षा कवचाला हानी पोहचविणाºया वायू रोखण्याचा अधिकाधिक प्रयत्न करावा, या उद्देशाने नाशिककरांनी एक जनजागृतीपर ‘लेट्स टॉक,ओझोन वॉक’ या उपक्रमाचे आयोजन केले.निमित्त होते, नाशिक पोलीस आयुक्तालय, वुमन सोसायटी फॉर इन्वायर्मेंट कल्चर अॅण्ड एज्युकेशन व रोटरी क्लब आॅफ नाशिक यांनी आयोजित केलेल्या ‘लेट्स टॉक, ओझोन वॉक’ या प्रबोधनपर कार्यक्रमाचे.
ओझोन डे निमित्ताने पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली गोल्फ क्लब मैदानावर शनिवारी (दि.१६) ओझोन वॉकचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, नितीन महाजन, रतन लथ, शालिनी कडवे, डॉ. राज नगरकर, प्रदीप शेनॉय, रोटरी क्लबचे अध्यक्ष दिलीपसिंह बेनीवाल, रुजुता मुळे आदींसह नाशिकमधील औद्योगिक, सामाजिक, पर्यावरणप्रेमी, शैक्षणिक युवक व्यावसायिक, सरकारी व निमसरकारी संस्थांसह बांधकाम व्यावसायिक व अन्य संस्थांनीही या ओझोन वॉकमध्ये पांढºया रंगाचे कपडे परिधान करून सहभाग नोंदवला. नाशिकला पर्यावरण राजधानी करण्याच्या दृष्टीने नाशिककरांनी ओझोन वॉकमध्ये घेतलेला सहभाग महत्त्वाचा असल्याचे मत रवींद्र सिंगल यांनी यावेळी व्यक्त केले. समन्वयक धनश्री हरदास यांनी प्रास्ताविक केले.