शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

‘पत्रकार सायकल रॅली’तून आरोग्य सुंदरतेचा संदेश पत्रकार दिन : माध्यम प्रतिनिधींचा उत्स्फू र्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 12:34 AM

नाशिक : नाशिककरांचे आरोग्य अधिकाधिक सुंदर व्हावे यासाठी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन आणि एचसीजी मानवता कॅन्सर हॉॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाचे औचित्य साधत ‘पत्रकार सायकल रॅली’चे शनिवारी (दि. ६) आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देरॅलीला मोठ्या उत्साहात सुरुवात आकर्षक सायकल भेट

नाशिक : नाशिककरांचे आरोग्य अधिकाधिक सुंदर व्हावे यासाठी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन आणि एचसीजी मानवता कॅन्सर हॉॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाचे औचित्य साधत ‘पत्रकार सायकल रॅली’चे शनिवारी (दि. ६) आयोजन करण्यात आले होते.मुंबई-आग्रा महामार्ग येथील डॉ. राज नगरकर संचलित एचसीजी मानवता कॅन्सर हॉॅस्पिटलच्या प्रांगणातून मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या आगळ्यावेगळ्या रॅलीला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. पांढरा आणि लेवेंडर अशी आकर्षक रंगसंगती असलेला टी शर्ट परिधान करत शहरातील विविध माध्यम प्रतिनिधींनी या सायकल रॅलीत सहभाग घेतला. कुठलीही स्पर्धा नसलेल्या या सायकल रॅलीत प्रत्येक प्रतिनिधी रॅलीचे निर्धारित अंतर पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करत होते. कॅन्सर हॉॅस्पिटलच्या प्रांगणातून निघालेली ही सायकल रॅली मुंबई नाका, कुटे मार्ग, चांडक सर्कल, संभाजी चौक, गोविंदनगर लिंक रोड मार्गे पुन्हा मुंबई नाका या मार्गावरून काढण्यात आलेल्या या सायकल रॅलीचा पुन्हा हॉस्पिटलच्या प्रांगणात समारोप करण्यात आला. यावेळी सहभागी माध्यम प्रतिनिधींपैकी तीन पत्रकारांची सोडतीतून निवड करण्यात येऊन त्यांना आकर्षक सायकल भेट देण्यात आली. यामध्ये महाराष्ट्र टाइम्सचे दिनेश अमृतकर, लोकसत्ताचे मनोज मोरे, ई टीव्ही नेटवर्क १८चे रत्नदीप रणशूर यांचा समावेश होता. दरम्यान, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी खासदार भरतकुमार राऊत, मानवता क्युरी कॅन्सर हॉस्पिटलचे डॉ. राज नगरकर, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया, ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल, भ्रमरचे संपादक चंदुलाल शहा, पुण्यनगरीचे निवासी संपादक किरण लोखंडे, देशदूतचे कार्यकारी संपादक मिलिंद सजगुरे, वरिष्ठ पोलीस अधिकारी हरिष बैजल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. समारोपाप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. राज नगरकर यांनी प्रत्येकाने आरोग्य निरोगी रहावे यासाठी आजपासूनच व्यायाम करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. नाशिक शहराला हवामानाच्या दृष्टीने लाभलेली निसर्गदत्त देणगी कायम रहावी, अशी आशा व्यक्त केली. यावेळी प्रवीणकुमार खाबिया, वरिष्ठ पोलीस अधिकारी हरिष बैजल यांनी मनोगतात सायकलिस्टतर्फे राबविण्यात येणाºया उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन सुखदा तेलंग तर आभार अ‍ॅॅड. वैभव शेटे यांनी मानले.सायकल ट्रॅक होण्यासाठी प्रयत्न व्हावेतसायकलपटूंचे शहर म्हणून उदयास येत असलेल्या नाशिक शहरात सर्वत्र सायकल ट्रॅक विकसित होणे आवश्यक आहे. रस्त्याच्या दुतफर् ा सायकल ट्रॅक असण्यात गैर काय आहे, असा सवाल भरतकुमार राऊत यांनी यावेळी उपस्थित करताना ट्रॅक साकारण्यासाठी नाशिक मनपा आपली जबाबदारी झटकते ही चुकीची बाब आहे. पत्रकारांसाठी सहसा उपक्रम राबविण्यासाठी कुणीही पुढे येत नाहीत, परंतु नाशिक सायकलिस्टतर्फे पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेली सायकल रॅली हा स्तुत्य उपक्रम आहे, असे सांगताना राऊत यांनी पत्रकार आणि सायकल यांचे अतुट नाते असून पुण्यात आजही अनेक पत्रकार सायकलवर बातमीदारी करताना दिसतात, असे सांगितले.