येवला : परदेशातील मोठ्या पगाराची नोकरी सोडून देत ५० मायक्र ोन पेक्षा कमी जाडी असणारे सिंगल यूज प्लॅस्टिकचे दुष्परिणाम आणि त्यामुळे होणारी पर्यावरणाची हानी याच्या जनजागृतीसाठी एक अवलिया तरु ण सायकलवर भारत भ्रमंती करीत आहे. त्यातून प्लास्टिक मुक्तीचा संदेश पोहोचविला जात आहे. गुरुवारी सदर तरुणाचे येवल्यात आगमन झाले त्यावेळी सोशल मिडिया फोरमच्या कार्यकर्त्यांनी त्याचे स्वागत करत पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.मूळ मध्यप्रदेश मधील मैराणा येथील रहिवासी असलेल्या ब्रजेश शर्मा या तीस वर्षीय युवकाने गांधीनगर गुजरात येथून सायकलवर भारतभ्रमण करण्यास १७ सप्टेंबर २०१९ रोजी सुरूवात केली . आतापावेतो गुजरात, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि आता महाराष्ट्र असा सुमारे दहा हजार कि.मी. प्रवास सायकलवरुन करत तो येवल्यात दाखल झाला आहे. संपूर्ण भारतभर एक वर्षाच्या आत सायकल भ्रमंती करणार असल्याचे ब्रजेश शर्मा यांनी यावेळी सांगितले . दिवसभरात १५० ते १८० कि.मी प्रवास सायकलवरून होत असून गावोगावी शाळा, महाविद्यालये तसेच जेथे कुणी भेटेल तेथे सिंगल यूज प्लॅस्टीक वापराचे व त्याच्या मुळे होणाऱ्या प्रदुषणाचे दुष्परिणाम सांगून जनजागृती केली जात आहे. ब्रजेश शर्मा याने टीसीएस या कंपनीसह जॉर्जिया, आर्मेनिया येथे नोकरी केली आहे . मात्र, समाजासाठी काही तरी वेगळे करण्याच्या उददेशाने त्याने जनजागृतीला सुरुवात केली आहे. गुरु वारी शर्मा औरंगाबाद कडून येवल्यात दाखल झाला त्यावेळी प्रथम कोटमगाव देवस्थान तर्फे तर येवला शहरात सोशल मीडिया फोरमच्या कार्यकर्त्यांनी स्वागत करीत त्याला सिंगल युज प्लास्टिक वापरणार नाही आणि दुसऱ्यांनाही वापरू देणार नाही असा शब्द देत पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या .
सायकलवर भ्रमंती करत प्लास्टिक मुक्तीचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2020 5:25 PM
मध्यप्रदेशच्या तरुणाचा उपक्रम : येवलेकरांनी केले स्वागत
ठळक मुद्दे ब्रजेश शर्मा याने टीसीएस या कंपनीसह जॉर्जिया, आर्मेनिया येथे नोकरी केली आहे