नाशिक :
जून्या नाशकातील बडी दर्गा परिसरातील म्हसरूळ टेक भागात पवार वाड्याला बुधवारी (दि.५) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अचानक आगल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. परिसरातील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात न आल्याने स्थानिकांनी अग्नीशमन दलाला घटनेची माहिती देताच अग्नीशमनदलाचे दोन बंब मेगा बाउजरसह जवानानी घटना स्थळी दाखल होत तब्बल दोन तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले.
म्हसरूळ टेकवरील पवार वाड्यात पवार, पेंढारकर व साळुंखे कुटुंब राहत असून या वाड्याला बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास लागलेली आग संपूर्ण नियंत्रणात आणण्यासाठी अग्नीशमनदलाच्या जवानांना तीन बंबांसह तब्बल दोन तास प्रयत्न करावे लागले. या कालावधीत परिसरातील तरुणांनी व अग्नशीमन दलाच्या जवानांनी घरात असलेल्या स्वयंपाकाच्या गॅसचे सिलेंडर बाहेर काढण्यात यश मिळविल्याने सुदैवाने मोठी घटना टळली. मात्र ,पेढारकर कुटुंबियांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य वाचविण्यासाठी सागर पेंढारकर हा तरुण जीवारचे धाडस करून घरात घुसल्याने तो किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान, पोलिसांसह माजी नगरसेवक गजानन शेलार यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांना परिसरात गर्दी न करता अग्नशमन दलाच्या जवानांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.अग्नीशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी पोहोचण्यात अडसरपवार वाड्याला आग लागल्याची घटना कळताच भद्रकाली पोलिस ठाण्यातील पोलिस पथक व अग्नीशमन दलाचे पथक दोन बंब व एका मेहा बाऊजरसह घटनास्थळी दाखल झाले. मात्र अरुंद रस्त्यांमुळे घटास्थळापर्यंत बंब पोहोचण्यात अडसर अल्याने आगीपासून पाचशे मिटरच्या अंतरावरच बंब उभे करून पाईपच्या साह्याने घटनास्थळापर्यंत पाणी नेऊन आग विझविण्यात आली. यावेळी मुख्य अग्नीशमन अधिकारी संजय बैरागी, स्टेशन ऑफिसर राजेंद्र बैरागी, लिडिंग फायरमन इक्बाल शेख , डी .आर. गाडे आदींसह पंचवटी व विभागीय पंचवटी अग्नीशमन केंद्राचे जावनांनीही आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.