शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
3
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
4
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
5
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
6
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
7
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
8
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
9
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
10
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
11
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
12
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
13
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
14
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
15
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
16
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
17
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
18
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
19
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
20
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!

म्हसरूळ : बाकावर बसलेल्या युवकावर झाडल्या गोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 6:28 PM

दोघा हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत अज्ञात कारणावरून वाद करत जवळील पिस्तूल काढून त्याच्या डोक्यावर दोन गोळ्या झाडल्या.

ठळक मुद्देएक गोळी डोक्यात घुसली पोलिसांपुढे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान

पंचवटी : बोरगड परिसरातील एकतानगरमध्ये बुधवारी (दि.७) रात्री जेवणानंतर बाकावर बसून मित्रासमवेत गप्पा मारणाऱ्या एका तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत वाद घालून थेट डोक्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात नितीन परदेशी नामक युवक गंभीर जखमी झाला असून, हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर नितीन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता, अत्यवस्थ अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, म्हसरूळ एकतानगर येथे राहणारा नितीन परदेशी हा बुधवारी (दि.६) रात्री साडेदहा वाजता परिसरातील साती आसरा मंदिराजवळ लोखंडी बाकावर मित्रासमवेत बसलेला होता. यातील काही युवक यावेळी मद्यपान करत होते. मद्यपान झाल्यानंतर ते निघून गेले असता बाकावर नितीन एकटाच होता. यावेळी दोघा हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत अज्ञात कारणावरून वाद करत जवळील पिस्तूल काढून त्याच्या डोक्यावर दोन गोळ्या झाडल्या. एक गोळी डोक्यात घुसली तर दुसरी गोळी छाटून गेल्याचे समजते. या गोळीबारात नितीन गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.गोळीबाराच्या घटनेने म्हसरूळ परिसरात तणावाचे वातावरण पसरले असून, पोलीस हल्लेखोरांचा माग काढत असले तरी उशिरापर्यंत संशयितांना अटक करण्यात आली नव्हती. दरम्यान, डोक्यात गोळी शिरल्याने नितीनची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.बोरगड (एकतानगरला) झालेल्या गोळीबाराच्या घटनेत युवक जखमी झाल्याची माहिती मिळताच पोलीस अधिका-यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. दरम्यान, या गोळीबार घटनेनंतर म्हसरूळ पोलिसांनी वाल्मीकनगर (वाघाडी) परिसरात राहणाºया एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे समजते. काही महिन्यांपूर्वीच म्हसरूळला एका सराईत गुन्हेगाराची हत्या झाली होती, तर गेल्या काही दिवसांपूर्वी हवेत गोळीबाराची घटना घडल्याची चर्चा होती, परंतु पोलिसांनी त्यास दुजोरा दिलेला नव्हता. एकूणच म्हसरूळ शिवारात राजरोसपणे सर्रास गावठी पिस्तूल घेऊन फिरणा-या गुन्हेगारांची दहशत वाढत असून, पोलिसांपुढे अशा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी जखमी नितीनच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Shootingगोळीबारnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय