कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यात मातेरेवाडी गावानंतर म्हेळुस्के गाव संसर्गाने अधिक बाधित होते. या लाटेत अनेकांचा बळी घेतला. घराघरांतील कर्तेपुरुष कुटुंबाने गमावले. त्यामुळे संपूर्ण म्हेळुस्के गावावर शोककळा पसरली होती. कोरोनाला हरविण्यासाठी उपाययोजना म्हणून गावातच विलगीकरण कक्ष उभारण्यात आला. तसेच लसीकरण मोहीम पूर्ण गावाने यशस्वीरीत्या राबविली. आता पूर्ण गाव कोरोनामुक्त झाले आहे. यासाठी स्थानिक ग्रामपंचायत, युवा वर्ग, सामाजिक कार्यकर्ते आदींनी योगदान दिले. कोरोनातून सावरल्यानंतर आता ग्रामपंचायतीचे विकासकामांकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यातूनच संपूर्ण गावातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. लखमापूर व म्हेळुस्के गावाला जोडणारा कादवा नदीवरील पूल अनेक वर्षांपासून अनेक खडतर समस्यांनी ग्रासला होता. त्याचेही काम पूर्णत्वाकडे आहे. याशिवाय, पाणीपुरवठा योजना, आरोग्य सुविधा, नवीन बेघर योजना आदी विकासकामांसाठी ग्रामपंचायतीने आता पुढाकार घेतला आहे. यासाठी सरपंच योगीता बर्डे, उपसरपंच योगेश बर्डे, ग्रामसेवक यांचेसह सदस्यांचे सहकार्य लाभत आहे.
कोट...
ग्रामपंचायत निवडणूक संपत नाही तोच कोरोनाची दुसरी लाट उसळली. त्यामध्ये आम्हाला विकासकामांमध्ये मार्गदर्शन करणारी चांगली माणसे कोरोनाने हिरावून नेली; परंतु गावकऱ्यांनी एकत्र येत गाव कोरोनामुक्त केले आहे. आता अपुरी विकासकामे पूर्ण करीत आहोत. त्यासाठी संपूर्ण म्हेळुस्के गावाचे सहकार्य मिळत आहे.
- योगेश बर्डे, उपसरपंच, म्हेळुस्के
फोटो- १९ म्हेळुस्के टाऊन
म्हेळुस्के गावात रस्त्याचे झालेले काँक्रिटीकरण.
===Photopath===
190621\140119nsk_24_19062021_13.jpg
===Caption===
फोटो- १९ म्हेळुस्के टाऊनम्हेळुस्के येथील गावात रस्त्यांचे झालेले काँक्रीटीकरण.