नाशिक : महापालिकेच्या शाळांमधील प्राथमिकच्या वर्गांना आठवी आणि नववीचे वर्ग जोडण्याची तयारी सुरू करण्यात आली असून, नव्या शैक्षणिक वर्षापासून बहुतांशी शाळांमध्ये नववीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे महापालिकेच्या शाळांमधून आठवीनंतर अन्य शाळेत प्रवेशासाठी संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांची भ्रमंती थांबणार आहे.महापालिका शिक्षण विभागाच्या ९० प्राथमिक शाळा असून, १२ माध्यमिक शाळा आहेत. शिक्षणहक्क कायद्यातील सुधारणांनुसार पूर्वी सातवीपर्यंत असलेल्या वर्गांना आठवीपर्यंतचे वर्ग अलीकडेच जोडण्यात आले आहेत. तथापि आठवीपर्यंत या शाळांमध्ये शिक्षण घेतल्यानंतर नववी आणि दहावीसाठी विद्यार्थ्यांना अन्य शाळा शोधाव्या लागतात. खासगी शाळांमध्ये अगोदरच मुले उपलब्ध असल्याने महापालिकेच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवण्यात अडचणी येतात. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेनेच नववीचे वर्ग सुरू करावे, अशी मागणी शिक्षण समितीच्या बैठकीत करण्यात आली होती.क्रीडा महोत्सव बारगळलाफेबु्रवारी महिन्यात महापालिका शाळेतील मुलांसाठी क्रीडा महोत्सव घेण्याचे नियोजन होते. मात्र ते शक्य झाले नाही.आता आचारसंहिता तसेच मुलांच्या परीक्षांचे दिवस असल्याने महोत्सव बारगळला आहे.क्रीडा स्पर्धा व्हाव्यात यासाठी पालिकेकडे पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करण्यात आले.
प्राथमिक शाळांना जोडणार माध्यमिकचे वर्ग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:54 AM