मालेगाव : अस्वच्छ ठिकाणी निवाºयाची व्यवस्था केल्याने संतप्तमालेगाव : मालेगावी कोरोनाशी दोन हात करण्यासाठी आलेल्या परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था अस्वच्छतेचे आगार असलेल्या तसेच दुरावस्था झालेल्या मुलांच्या वस्तीगृहात केल्याने कर्मचाºयांनी संताप व्यक्त केला शनिवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला आह़ेमालेगाव शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी तातडीने वाढीव अधिकारी व कर्मचाºयांची नियुक्ती करण्याचे आदेश राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले होते त्यानुसार राज्यमंर्त्यांच्या आदेशाची जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश जगदाळे यांनी अंमलबजावणी करीत८ वैद्यकीय अधिकारी ,१० प्रयोगशाळा तज्ञ ,३६ पारिचारिका यांना तातडीने मालेगावी हजर होण्याची आदेश दिले होते वेळेत हजर न झाल्यास कारवाईचा बडगा उगारण्याचा इशाराही देण्यात आला होता त्यामुळे अधिकारी व कर्मचारी दोन टप्प्यात मालेगावी दाखल झाले आहेत शनिवारी रात्री आलेल्या कर्मचाºयांची निवासाची व्यवस्था कॅम्प भागातील मुलांच्या वसतिगृहात करण्यात आली होती मात्र वसतीगृहात दैनंदिन झाडलोट होत नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे़ शौचालयांचे दरवाजे तुटलेल्या अवस्थेत आहेत ,नळांना पाणी नाही महिला व पुरुष कर्मचाºयांची राहण्याची सोय एकत्र करण्यात आली होती यामुळे संतप्त झालेल्या परिचारिका व कर्मचाºयांनी होस्टेलच्या प्रवेशद्वारावरच काही काळ आंदोलन केले़ वरिष्ठ अधिकाºयांना सांगून देखील दखल घेतली जात नव्हती त्यामुळे कर्मचाºयांची काहीकाळ झाली यानंतर महापालिका प्रशासनाने परिचारिकांची निवास व्यवस्था त्या भागात केल्यामुळे या वादावर पडदा पडला तरीदेखील कर्मचाºयांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे़
आरोग्य कर्मचाऱ्यांचे मध्यरात्री आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2020 9:34 PM
मालेगाव : अस्वच्छ ठिकाणी निवाºयाची व्यवस्था केल्याने संतप्तमालेगाव : मालेगावी कोरोनाशी दोन हात करण्यासाठी आलेल्या परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था अस्वच्छतेचे आगार असलेल्या तसेच दुरावस्था झालेल्या मुलांच्या वस्तीगृहात केल्याने कर्मचाºयांनी संताप व्यक्त केला शनिवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला आह़े
ठळक मुद्देतरीदेखील कर्मचाºयांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे़