चौकट====
अशी आहे प्रशस्त इमारत
नाशिकरोड न्यायालयाची इमारत ३८४२ चौरस मीटर जागेत बांधण्यात आली आहे. त्यामध्ये आठ न्यायालय, एक लोक न्यायालय, कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कार्यालय, पक्षकारांना बसण्यासाठी वेटिंग रूम, स्टॅम्प वेंडर यांना बसण्यासाठी जागा, वाहनतळ अशा विविध सर्व सोयीसुविधा उभारण्यात आल्या आहेत. इमारतीमधील फर्निचरचे कामदेखील पूर्ण झाले आहे. न्यायालयासाठी जनरेटरदेखील बसविण्यात आले आहे. न्यायालयाच्या पाठीमागील बाजूस न्यायाधीश निवासस्थानासाठी दहा क्वॉर्टर आहेत, तर न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या आवारात जिल्हा न्यायाधीश निवासस्थान बांधण्याचा प्रस्तावदेखील पाठविण्यात आला आहे. न्यायालय इमारतीच्या पुढील बाजूस लॉन्स व संरक्षक भिंतीलगत चोहोंबाजूने आकर्षक झाडे लावण्यात आली आहे.
(फोटो ०५ कोर्ट)
चौकट
नाशिकरोड न्यायालयाच्या नवीन प्रशस्त इमारतीत आठ न्यायालये आपले कामकाज स्वतंत्रपणे चालवू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये चार कनिष्ठ स्तर, दोन वरिष्ठ स्तर यांच्यासोबत दोन जिल्हा न्यायालय येण्याची दाट शक्यता आहे.