नाशिक- पेठ तालुक्यातील भूकंपाचे केंद्रबिंदू असलेल्या गोंदे परिसराला मंगळवारी (10 जुलै) रोजी भुकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण आहे. मेरी येथील भुकंपमापक यंत्रात 2.7 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाली आहे.
मंगळवारी सकाळी साधारण साडेसात वाजता गोंदे, कोहोर, भायगाव परिसरात भुगर्भात मोठा आवाज झाला. तसेच घरांनाही हादरा बसल्याचे अनेकांना स्पष्टपणे जाणवले. यामुळे नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले. या परिसरात भुकंपमापन यंत्र नसल्याने नागरिकांना कोणत्याही प्रकारची चाहुल लागत नाही.