बाबापूर परिसरात गेल्या महिनाभरापासून भूकंपसदृश जमिनीला हादरे बसत आहेत. मात्र बुधवारी ( दि. १५) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास आवाज होत मोठा हादरा बसल्याने झोपेत असलेले काही रहिवासी घाबरून उठले. दरम्यान, याबाबतची माहिती तहसील कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय व मेरी येथील भूकंप आधार सामग्री पृथ्थकरण कक्षात कळविण्यात आली असल्याचे व ग्रामस्थांनी घाबरून न जाता आपले नित्य कामे चालू ठेवून काळजी घेण्याचे आवाहन तहसीलदार पंकज पवार यांनी ग्रामस्थांना केले. प्रशासन आपल्या पाठीशी असल्याचे सांगत त्यांनी ग्रामस्थांना धीरही दिला. यावेळी मंडल अधिकारी केसरे, तलाठी पवार, सरपंच गुलाब गावीत, पोलीसपाटील जितेंद्र गायकवाड, मोहन वाघ, सुभाष राऊत, चेतन राऊत, नामदेव पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
दिंडोरी तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 4:15 AM