शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

दुचाकींच्या धडकेत मायलेकाने गमावले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 4:11 AM

पंचवटी : मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या नवीन आडगाव नाक्यालगत समांतर रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मायलेक ठार ...

पंचवटी : मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या नवीन आडगाव नाक्यालगत समांतर रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मायलेक ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

दिंडोरी रोडवरील कलानगर येथील रहिवासी धम्मपाल खिल्लारे हे सोमवारी रात्री पावणेआठ वाजेच्या सुमाराला आई अंजनाबाई व भाऊ

दादाराव यांच्यासह दुचाकीवरून (एमएच १५ एफडी०३६४) नवीन आडगाव नाकामार्गे समांतर रस्त्याने जात असताना समोरून भरधाव आलेल्या ॲक्टिव्हा दुचाकीने धडक दिली. त्यात दुचाकीचे चाक तुटल्याने दुचाकी दुभाजकावर जाऊन आदळली आणि अंजनाबाई व दादाराव, चालक धम्मपाल असे तिघे दुचाकीवरून खाली कोसळले.

अंजनाबाई आणि दादाराव गंभीरपणे जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी दोघांना तपासून मयत घोषित केले.

अंजनाबाई नाथा खिल्लारे (६०) व तदादाराव नाथा खिल्लारे (४०) असे मृत्युमुखी पडलेल्या मायलेकाची नावे आहेत. धम्मपालदेखील जखमी झाला आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात धम्मपाल खिल्लारेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----–

---इन्फो--

ती भेट ठरली अखेरची

अपघातात ठार झालेले अंजनाबाई व दादाराव हे मायलेक मूळ परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील भोगावचे रहिवासी आहेत. त्यांचा दुसरा मुलगा धम्मपाल हे दिंडोरी रोडवर असलेल्या कलानगर म्हाडा बिल्डिंगमध्ये वॉचमन म्हणून नोकरी करतात. काही दिवसांपूर्वी आई अंजनाबाई व भाऊ दादाराव असे दोघेही धम्मपालला भेटण्यासाठी परभणी येथून त्याच्या घरी आले होते. सोमवारी पुन्हा आपल्या मूळ गावी परत जायचे असल्याने मुलगा धम्मपाल दुचाकीवरून नाशिक रोड रेल्वेस्थानकावर त्यांना सोडविण्यासाठी जात असताना काळाने झडप घातली आणि झालेल्या अपघातात धम्मपालला आपली आई आणि भावाला कायमचे गमवावे लागले.