शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

मका पिकावर लष्करी अळीचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 4:49 PM

लोहोणेर : यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावल्यामुळे काही शेतकऱ्यांनी रोहिणी व मृग नक्षत्रात आलेल्या पावसावर मका पिकाची लागवड केली आहे. बहुतांशी शेतकºयांनी ७ जूनच्या आसपास पेरणी केली आहे. देवळ्यासह कसमादे पट्ट्यात ८० टक्के शेतकरी मक्याची लागवड करतात. गतवर्षी अवकाळी पाऊस व लष्करी अळीने थैमान घातले होते.

ठळक मुद्देपहिल्या पंधरवड्यातच निम्मे पीक बाधित : शेतकऱ्यांनी फिरवला पाच एकरावर ट्रॅक्टर

लोहोणेर : यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावल्यामुळे काही शेतकऱ्यांनी रोहिणी व मृग नक्षत्रात आलेल्या पावसावर मका पिकाची लागवड केली आहे. बहुतांशी शेतकºयांनी ७ जूनच्या आसपास पेरणी केली आहे. देवळ्यासह कसमादे पट्ट्यात ८० टक्के शेतकरी मक्याची लागवड करतात. गतवर्षी अवकाळी पाऊस व लष्करी अळीने थैमान घातले होते. त्यामुळे ५० टक्के मक्याचे उत्पन्न घटले होते. त्याचा परिणाम मक्याच्या दरावर होऊन बाजारभाव २००० ते २२०० रु पयांपर्यंत वधारले होते. परंतु लॉकडाऊनमुळे जिल्ह्याच्या सीमा बंद असल्याने स्थानिक उत्पादकांना याचा फायदा झाला नाही. मक्याचे दर निम्म्याने घसरले आहे. त्यावर शासनाची मलमपट्टी म्हणून मका पिकाची हमीभावाने खरेदी सुरू केली आहे. परंतु शासनाकडे पुरेसे बारदान, वजनकाटे, गुदामे उपलब्ध नसल्याने ही खरेदी कासव गतीने सुरू आहे.अशा परिस्थितीत शेतकºयांकडे दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने कसमादे पट्ट्यात मागील पंधरवड्यात ७० ते ८०टक्के शेतकºयांनी मक्याची पेरणी केली आहे. देवळा, कळवण, सटाणा आदी तालुक्यात विठेवाडी, सावकी, खामखेडा, लोहणेर, भऊर आदी परिसरात सर्वत्र मका हे मुख्य खरीप पीक समजले जाते. प्रारंभीच मका रोपांवर लष्करी अळीने हल्ला चढवला आहे. बहुतांश शेतकरी औषध फवारणी करीत असले तरी काही भागावर प्रादुर्भाव वाढला आहे. लष्करी अळीचा कायमचा बंदोबस्त होत नसल्यामुळे हजारो रुपये खर्च करूनही उत्पन्नाची शास्वती वाटत नसल्याने विठेवाडी येथील शेतकरी व माजी सरपंच नंदलाल निकम यांनी त्यांच्या चार एकरावरील मका पिकावर ट्रॅक्टर फिरवला. त्यांनी पाच एकर क्षेत्रात सीजेंटा ६६६८ जातीच्या वाणाचे बियाणे ४ जूनला टाकले होते. त्यासाठी १३ किलो बियाणे घेतले होते.त्यासाठी पेरणी, मशागत, मजुरी, रासायनिक खते, कीटकनाशक आदींकरिता सुमारे ४० हजार रु पये खर्च करूनही लष्करी अळी आटोक्यात येईल, याची खात्री नसल्यामुळे त्यांनी पिकावर ट्रॅक्टर फिरवला. सदर घटना तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे यांना कळविली असून त्यांनी शेतकºयाच्या बांधावर येऊन पाहणी करावी व परिसरातील शेतकºयांना लष्करी अळीपासुन संरक्षण करण्यासाठी मार्गदर्शन करावे, अशी मागणी केली आहे.देवळा तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात सुरुवातीलाच मका पीक लष्करी अळीने बाधित झाले आहे. यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील हे समजून सागंण्यासाठी शासकीय कृषी अधिकारी व संबंधित यंत्रणेने पुढाकार घेऊन योग्य ती काळजी घ्यावी.- कुबेर जाधव, समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी