पेठ - तालुक्यातील कोहोर येथील शासकीय आश्रमशाळेत मार्शल कॅडेट फोर्स च्या प्रशिक्षकांनी सैनिकी प्रशिक्षण वर्ग सुरु केले असून आदिवासी विद्यार्थी या प्रशिक्षणास चांगला प्रतिसाद देत आहेत.यावेळी २२ प्रकारची प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली. विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण, तलवारबाजी, घोडेस्वारी,अर्चरी,निशानेबाजी (धनुष्यबाण व रायफल) ,मलखांब-रोप मलखांब,लाठी काठी, दांडपट्टा चालविणे, मार्शल आर्ट ,कराटे, स्व स्वरक्षनासाठीचे सर्व धडे, पर्यावरण जागृती,योगा आण िध्यानधारणा, संपूर्ण आरोग्य तपासणी इत्यादी प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.विशेष म्हणजे आदिवासी विकास विभागामार्फत संपूर्ण राज्यभरात चालविल्या जाणाऱ्या ५२२ शासकीय आश्रम शाळा मध्ये प्रथमच कोहोर ता.पेठ नाशिक या ठिकाणी सदर प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यासाठी प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आले आहेत. याप्रसंगी नाशिक जिल्हा समन्वयक अश्विनी तांबट , सोमनाथ पगार , प्रशांत सूर्यवंशी, प्राचार्य प्रकाश पगार, अधीक्षक संतोष सूर्यवंशी अधीक्षिका मनिषा बागडे ,गावाचे सरपंच गिरीधर वाघेरे शालेय व्यवस्थापन समतिी अध्यक्ष भास्कर भिवसन , पोलीस पाटील सोमनाथ वाघेरे , प्रभाकर भगरे ,निसार सेख, सुरेश भिवसन व तसेच ग्रामस्त पालकवर्ग व शालेय विद्याथी उपस्थित होते.
आदिवासी विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षणाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 1:15 PM