नाशिक : जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सप्तशृंगगडावर जगदंबेला दुग्धाभिषेक करून दूध आंदोलनाला सुरुवात केली असून, मुंबईचा दूधपुरवठा रोखण्यासाठी सोमवारी (दि. १६) इगतपुरी तालुक्यातील घोटी टोलनाक्यावर ‘गनिमी कावा’ पद्धतीने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिली आहे.नाशिक जिल्ह्यातून एकही दुधाचा टँकर मुंबईला पोहचू दिले जाणार नाही. त्यासाठी जिल्ह्यात ‘गनिमी कावा’ करून आंदोलन करण्यात येणार असून, इगतपुरी तालुक्यातील घोटी टोलनाक्यावर दुपारी १ वाजेपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मुंबईचा दूधपुरवठा रोखणार आहे. त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून नाशिकमार्गे मुंबईकडे जाणारे दूधही रोखले जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील वेगवेगळ्या रस्त्यांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यक र्ते आंदोलन करणार आहे. दरम्यान, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी कोणत्याही परिस्थितीत मुंबईचा दूधपुरवठा खंडित होऊ दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्ह्णातील वेगवेगळ्या प्रमुख रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात करून आंदोलकांना हटविण्याची शक्यता असल्याने स्वाभिमानीतर्फे आंदोलनासाठी ‘गनिमी कावा’ तंत्र वापरण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी दिली आहे.आई सप्तशृंगीच्या पायथ्याशी दुग्धाभिषेक करून आंदोलनला प्रारंभ करण्यात आला. सप्तशृंगी माता शासनाला सद्बुध्दी देवो. शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच रु पये याप्रमाणे अनुदान मिळावे आणि यापुढे दुधाला रास्त भाव मिळावा, असे साकडे देवीला यावेळी घालण्यात आले, असे हंसराज पाटील यांनी दुग्धाभिषेकानंतर सांगितले.
दुधाचे आंदोलन पेटण्याचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 1:04 AM
नाशिक : जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सप्तशृंगगडावर जगदंबेला दुग्धाभिषेक करून दूध आंदोलनाला सुरुवात केली असून, मुंबईचा दूधपुरवठा रोखण्यासाठी सोमवारी (दि. १६) इगतपुरी तालुक्यातील घोटी टोलनाक्यावर ‘गनिमी कावा’ पद्धतीने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिली आहे.
ठळक मुद्देमुंबई-आग्रा महामार्ग रोखणार जगदंबेला दुग्धाभिषेकाने आंदोलनास प्रारंभ