शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 12:05 AM

संपूर्ण देशात सुरू असलेल्या संचारबंदीमुळे जिल्ह्यातील दूध वितरणावर विपरीत परिणाम झाला असून, त्यामुळे दूध व्यवसायाशी संबंधित सर्वच घटक अडचणीत सापडले आहेत. गेल्या १० दिवसांत दुधाचे दर तब्बल १० रुपयांनी घसरले आहेत. परिणामी दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

ठळक मुद्देकोरोनाचा परिणाम : प्रकल्पांना शासनाने मदत करण्याची मागणी

नाशिक : संपूर्ण देशात सुरू असलेल्या संचारबंदीमुळे जिल्ह्यातील दूध वितरणावर विपरीत परिणाम झाला असून, त्यामुळे दूध व्यवसायाशी संबंधित सर्वच घटक अडचणीत सापडले आहेत. गेल्या १० दिवसांत दुधाचे दर तब्बल १० रुपयांनी घसरले आहेत. परिणामी दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. वितरणावर परिणाम झाल्यामुळे दोन-तीन दिवस टॅँकर खाली होत नसल्यामुळे काही संस्थांनी दिवसाआड संकलन करण्यास सुरु वात केली आहे .जिल्ह्यात खासगी आणि सहकारी संस्थांकडून दररोज सुमारे सहा ते साडेसहा लाख लिटर दूध संकलन केले जाते. त्यात सर्वाधिक वाटा सिन्नर तालुक्याचा आहे. सिन्नर तालुक्यात सुमारे तीन ते साडेतीन लाख, येवला तालुक्यात १.५० ते २ लाख, तर निफाड तालुक्यात सुमारे एक लाख लिटर दूध संकलन होत असते. या तीन तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यात दूध उत्पादन कमी आहे. जिल्ह्यातून संकलित झालेले दूध गुजरातमधील अमूल, मंचर येथील पराग, श्रीरामपूर येथील प्रभात, अहमदनगर येथील पारस या दूध डेअरींना पाठविले जाते. याशिवाय गुजरातमधील सूरत जिल्ह्यात दूध वितरित होते. याशिवाय येवला तालुक्यात अमूल दूध डेअरी अंतर्गत दोन संस्था दूध संकलनाचे काम करतात. याशिवाय काही खासगी संस्थाही कार्यरत आहेत. जिल्ह्यात संचारबंदी असली तरी त्याचा दूध संकलनावर फारसा परिणाम झालेला नाही .दूध वितरणात संस्थांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. मनुष्यबळ कमी असल्यामुळे टॅँकर वेळच्यावेळी खाली होत नाहीत. दुधाची मागणी कमी झाल्याने संस्थांना पेमेंट वेळेवर मिळत नाही. शिवाय दुधाच्या इतर उपपदार्थांची मागणी घटल्याने मोठ्या प्रमाणात दूध पडून आहे.दरम्यान, एकट्या सिन्नर सहकारी दूध संघाची नाशिकच्या किरकोळ बाजारात दररोज सुमारे २००० लिटरची विक्री होते. मागणी कमी झाल्याने आज ही विक्री २०० लिटरवर आली आहे. सुमारे ९० टक्के विक्री कमी झाल्याने संघासमोर विविध समस्या उभ्या राहिल्या आहेत.परिणामी दुधाचे दर १० रुपयांनी कमी झाले आहेत. २० मार्च रोजी दुधाला प्रतिलिटर ३२ रु पये भाव मिळत होता. १ एप्रिल रोजी तोच दर २२ रु पयांवर आला आहे. संचारबंदीमुळे काही खासगी संस्थांनी संकलन बंद केले आहे किंवा ते दिवसाआड किंवा दोन दिवसाआड संकलन करतात. सहकारी संस्थांना मात्र दररोज संकलन करावे लागते. याशिवाय सहकारी संस्थांना दर पाच दिवसांनी शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागतात यामुळे शासनाने सहकारी संस्थांना खेळत्या भांडवलाची मदत करावी, अशी मागणी होऊ लागली आहे .प्रकल्पांना भागभांडवल देण्याचा आग्रहदुधाचे दर कमी होऊ लागल्याने शासनाने २५ रुपये दर देण्याची घोषणा करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे, मात्र यामुळे दूध प्रकल्प अडचणीत येतील, असे एका संस्थेच्या व्यवस्थापकांनी सांगितले. तूट भरून काढण्यासाठी शासनाने दूध प्रकल्पांना भागभांडवल देऊन मदत केली तरच शेतकºयांना पेमेंट करणे शक्य होईल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाmilkदूध