शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
2
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
3
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने दिवाळीत दाखवली लेकीची पहिली झलक, ठेवलं हे नाव
4
कॅनडा-भारत तणावपूर्ण वातावरणात PM ट्रुडो यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, हिंदूंबद्दल म्हणाले...
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: एकीकडे अब्दुल सत्तार यांना दणका, दुसरीकडे अरविंद सावंतांवर गुन्हा
6
भीषण आगीत सिलेंडरचा स्फोट; चार दुकाने जळून खाक! मुंब्रा-शिळफाटा परिसरातील घटना
7
Post Office Time Deposit: पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये पैसे गुंतवलेत? करा फक्त १ काम, मिळेल मूळ रकमेपेक्षा दुप्पट रक्कम
8
'पाणी' चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आदिनाथ म. कोठारे करणार 'या' चित्रपटाचं दिग्दर्शन
9
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
10
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
11
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
12
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
13
सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील
14
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
15
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचाही राज्यात धडाका 
17
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन
18
शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदारउच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश; प्रलंबित अर्जांची पडताळणी करा
19
सोने करणार मालामाल, सर्व विक्रम मागे पडणार! वर्षभरात ४१ वेळा गाठला उच्चांक, दरात ३४ टक्के वाढ
20
२२ व्या मजल्यावरून उडी मारत महिलेची आत्महत्या, कासारवडवलीतील घटना

जिल्ह्यात ठिकठिकाणी दूध बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 9:15 PM

दिंडोरी : दूध बंद आंदोलनाचा नाशिकमध्ये प्रारंभ स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी स्वत:च्याच चिंचखेड , ता.दिंडोरी, नाशिक या गावातील पुरातन शिव मंदिरात दूध अभिषेक करून केला.या वेळेस जि प सदस्य भास्कर भगरे, उपसरपंच सुभाष मातेरे,किरण पाटील, संपत जाधव ,दत्तू सोनवणे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.दुधाला पाच रु पये अनुदान द्या..शेतकरी ऐकजुटीचा विजय असो .या घोषणा देण्यात आल्या.

दिंडोरी : दूध बंद आंदोलनाचा नाशिकमध्ये प्रारंभ स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी स्वत:च्याच चिंचखेड , ता.दिंडोरी, नाशिक या गावातील पुरातन शिव मंदिरात दूध अभिषेक करून केला.या वेळेस जि प सदस्य भास्कर भगरे, उपसरपंच सुभाष मातेरे,किरण पाटील, संपत जाधव ,दत्तू सोनवणे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.दुधाला पाच रु पये अनुदान द्या..शेतकरी ऐकजुटीचा विजय असो .या घोषणा देण्यात आल्या.यावेळी केंद्र शासनाने २३ जूनचा दहा हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय त्वरीत रद्द करावा. ३० हजार टन दूध पावडरचा बफर स्टॉक करावा, तसेच निर्यात अनुदान प्रति किलो ३० रूपये देण्यात यावे.दूध पावडर, तूप, बटर व इतर दुग्धजन्य पदार्थावरील जीएसटी पूर्णपणे रद्द करावा.पुढील तीन मिहन्यासाठी राज्य सरकारने थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिलिटर पाच रूपये अनुदान जमा करावे. या प्रमुख मागण्या केंद्र व राज्य शासना कडे आमच्या आहे.असे संदीप जगताप यांनी सांगितले. शेतकर्यांच्या दुधाला चांगला भाव मिळणे गरजेचे आहे.असे जि प सदस्य भास्कर भगरे यांनी सांगितले. यावेळेस गावातील दूध संकलन केंद्राचे संचालक सुभाष मातेरे, गणेश संधान, यांचे आभार मानण्यात आले. या अभिषेकाला अनेक शेतकरी उपस्थित होते.--------------मथुरपाडेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलनमालेगाव : तालुक्यातील मथुरपाडे येथे स्वाभीमानी शेतकरी संघटनेतर्फे दूधाचे दर वाढवून मिळावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. आंदोलकांतर्फे अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलेल्या आवाहनानुसार मंगळवारी राज्यभर दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. दूधाला आठ रुपये वाढवून भाव मिळावा, शासनाने दूध पावडर आयात बंदी करावी आदी मागण्यांसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी होऊन शनिदेवाला अभिषेक केला व गरीबांसह उपस्थितांना मोफत दूधाचे वाटप करुन शासनाचा निषेध केला.४आंदोलनात संजय जाधव, अंकुश जगताप, विजय शिंदे, सुकदेव वाकचौरे, पोपट आवारे, डॉ. शरद पवार आदी सहभागी झाले होते. तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक ठाकरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.-------------स्वाभिमानीतर्फे मोफत दूध वाटपयेवला : दुधाला योग्य दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तालुक्यातील न्याहारखेडा येथे मोफत दूध वाटप करून अनोखे आंदोलन करण्यात आले. दुधाला अल्प भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. दुधाला योग्य दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दुध रस्त्यावर न फेकता न्याहारखेडा गावातील गरीबांना मोफत वाटप करण्यात आले. यावेळी केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा आंदोलकांच्या वतीने स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष श्रावण देवरे यांनी निषेध केला. आंदोलनात परिसराती दुध ऊत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.------------सिन्नरला महादेव मंदिरात पिंडीवर दुधाचा अभिषेकसिन्नर: पांगरी गावामध्ये सकाळी नऊ वाजता महादेवाच्या मंदिरात पिंडीवर अभिषेक घालून आंदोलनास सुरूवात करण्यात आली. शासनाने १ आॅगस्ट पर्यत दुधाला पाच रूपये लिटर प्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घ्यावा. १ तारखेपर्यत निर्णय नाही झाला तर राज्यव्यापी दूध बंद आंदोलन करण्याचे सूचित करण्यात आले आहे.शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ते यांनी गावोगावी आंदोलनची माहीती पोहचवली होती. यावेळी आत्माराम पगार, रवी पगार, कृष्णा घुमरे, बारकु पगार, वसंत पगार, धनंजय निरगुडे, संजय वारूळे, विश्वनाथ पगार, नीलेश पगार, बाळासाहेब कांडेकर, कैलास शिंदे, बाबासाहेब पगार, शांताराम पगार, सुभाष पगार आदी उपस्थित होते़

टॅग्स :Nashikनाशिक