लोकमत न्यूज नेटवर्कसाकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील शेतकऱ्यांनी आज सकाळी नांदगाव-वेहळगाव रस्तावर भाजीपाला व दूध रस्तावर ओतून शासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला. गुरुवारपासून संपूर्ण राज्यभर शेतकऱ्यांचा संप सुरू असून, नांदगावच्या ग्रामीण भागातील शेतकरीसुद्धा या संपात सहभागी झाले आहेत. संपाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी नांदगाव-वेहळगाव रस्तावर शेतकऱ्यांनी भाजीपाला व दूध ओतून आपला रोष व्यक्त केला. दुकान मालकांनी दुकाने बंद संपाला पाठिंबा जाहीर केला. यावेळी रामदास आहिरे, गणेश बोरसे साहेबराव बोरसे, अशोक खैरनार, समाधान बोरसे, विजय बोरसे, जगन सुरसे, वसंत बोरसे, एम. डी. बोरसे, अनिल बोरसे, सुदाम बोरसे, आदींसह शेतकरी उपस्थित होते.
नांदगाव-वेहेळगाव रस्त्यावर दुधाच्या धारा
By admin | Published: June 03, 2017 12:44 AM