नाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुंबईचा दूधपुरवठा खंडित करण्यासाठी आंदोलन छेडले असताना दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी मुंबईला कोणत्याही परिस्थितीत दूध कमी पडू दिले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. प्रसंगी पोलीस बंदोबस्तात मुंबईला दूधपुरवठा करण्यात येईल, कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही, असा इशाराही जानकर यांनी दिला आहे.नाशिकमध्ये एका विवाह सोहळ्यासाठी आले असताना पत्रकारांशी संवाद साधताना जानकर बोलत होते. महादेव जानकर म्हणाले, ज्यांना आंदोलन करण्याची इच्छा आहे, त्यांच्याबद्दल आम्ही काहीही सांगू शकत नाही. परंतु, कोणत्याही परिस्थीत मुंबईला दूधपुरवठा कमी पडू देणार नाही.दुधाची वाहतूक करणाऱ्या वाहनांसह दूध संकलन करणाºया संघांना संरक्षण दिले जाईल, त्यासाठी वेळ पडली तर आमचेही कार्यकर्ते मैदानात उतरतील, असा इशारा देतानाच दूध उत्पादकांनी न घाबरता दूधपुरवठा करण्याचे आवाहन जानकर यांनी यावेळी केले. तसेच आंदोलकांनी हिंसक होऊन कायदा हातात घेऊ नये, अन्यथाकायदेशीर कारवाई केली जाईल, अशी समजही त्यांनी आंदोलकांना दिली आहे.दूध संघांना नोटिसादुधाला २० तारखेपासून तीन रु पये दरवाढ केली जाणार असून, दुग्धजन्य पदार्थांवर जीएसटी कमी झाल्यास दोन रु पये वाढ मिळणार आहे. अशाप्रकारे एकूण पाच रु पये दरवाढ केलीच आहे. तसेच शेतकºयांना लवकरात लवकर योग्य दर दिला पाहिजे, यासाठी सर्व दूध संघांना नोटिसाही पाठविल्या आहे. दरासंबंधीच्या सूचनांची अंमलबजावणी न करणाºया दूधसंघावरही कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करतानाच जानकर यांनी अयोग्य दर देणाºया दूधसंघावरही कारवाई करण्याचा इशारा महादेव जानकर यांनी दिला आहे.
पोलीस बंदोबस्तात मुंबईला दूधपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:57 AM
नाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुंबईचा दूधपुरवठा खंडित करण्यासाठी आंदोलन छेडले असताना दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी मुंबईला कोणत्याही परिस्थितीत दूध कमी पडू दिले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. प्रसंगी पोलीस बंदोबस्तात मुंबईला दूधपुरवठा करण्यात येईल, कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही, असा इशाराही जानकर यांनी दिला आहे.
ठळक मुद्देजानकर : हिंसक आंदोलकांवर कारवाई करण्याचा इशारा