नाशिक : आर्थिक व सोने गुंतवणुकीवर जादा व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या मिरजकर सराफ व त्रिशा जेम्स घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार हर्षल नाईक याने कनार्टक राज्यातील गुलबर्गा येथे कोट्यवधी रुपयांची व्यावसायिक इमारत बांधल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आली आहे़ नाईकची ही मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत़ संचालकांसह दुकानातील कर्मचाºयांनी शेकडो गुंतवणूकदारांना आर्थिक तसेच सोने तारणावर दरमहा एक ते दीड टक्क ा व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून घेतली़; मात्र जानेवारीपासून गुंतवणूकदारांना पैसे मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये खळबळ उडाली होती़ अॅड़ केंगे यांच्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला़ आर्थिक गुन्हे शाखेने गुलबर्गा जिल्ह्यातील चिडीगुपा येथून फरार असलेल्या नाईकची मालमत्ता शोधून काढली आहे. नाईक याने या ठिकाणी एक शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारले असून, त्यात १६ गाळे आहेत. आर्थिक गुन्हे शाखेचे एक पथक गुलबर्गा जिल्ह्यातील चिडीगुपा या महाराष्ट्र राज्याच्या सीमावर्ती तालुक्यात जाऊन आले असून, त्यांनी नाईकची आणखी काही मालमत्तांचा शोध घेतला आहे़या प्रकरणात संचालक महेश मिरजकर, प्राजक्ता कुलकर्णी, कीर्ती नाईक व आशुतोष चंद्रात्रे यांना अटक केली आहे़, तर दुकानांच्या झडतीतून सोन्या-चांदीचे दागिने, कॉम्प्युटर, कागदपत्रे, दोन वाहने, असा ऐवज जप्त केला आहे़
घोटाळ्यातील सूत्रधारचे गुलबर्गा येथे कोट्यवधींचे संकुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:40 AM