उमराणे : मका पिकाची नासाडी केल्यानंतर आता लष्करी अळींनी बाजरी पिकाकडे मोर्चा वळविला असुन बाजरीला लागलेल्या कणसाच्या फुलोऱ्यात दडुन कोवळ्या दाण्यांची नासाडी सुरु केल्याने बाजरीचेही नुकसान होऊ लागले आहे. परिणामी लष्करी अळींच्या प्रादुर्भावाने शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून कोवळ्या मका पिकावर व लागलेल्या कणसांवर नासाडीचे वर्चस्व गाजविणाºया लष्करी अळींना आता मका पिकाचे झाड व कणसे टणक झाल्याने शिरकाव करण्यास कठीण होऊन लागले आहे. त्यामुळे नुकतेच बाजरीचे पिक आले असतानाच एका पिकावरु न दुसºया पिकावर लष्करी अळींचा फैलाव करणाºया पतंग किडीने बाजरी पिकाकडे मोर्चा वळविला आहे.त्यामुळे बाजरीला पिकाला लागलेल्या कोवळ्या कणसांवर लष्करी अळींचा फैलाव होण्यास सुरु वात झाली आहे. परिणामी लष्करी अळींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊन नुकत्याच आलेल्या बाजरीच्या कणसांवरील फुलोºयात दडुन लष्करी अळींनी बाजरीच्या कणसांचीही नासाडी सुरु केली. खरीप हंगामातील मका व बाजरी अशा दोन्ही पिकांचे लष्करी अळीने नुकसान केल्याने शेतकरी हैराण झाला आहे.
लष्करी अळीचा शिरकाव आता बाजरीच्या कणसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 2:16 PM