पेठ : दमण येथून आलेल्या तीन वाहनांची पेठ पोलिसांनी झडती घेतली असता त्यात लाखोंचा बेकायदेशीर मद्यसाठा आढळून आला. पोलिसांनी वाहनांसह मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. दरम्यान वाहनचालक वाहन सोडून फरार झाले.हवालदार डंबाळे यांना दमण येथून ओझरखेड या अतिदुर्गम गाव परिसरातून हरसूल मार्ग कोहोर भागातून करंजाळीकडे अज्ञात वाहने संशयितरीत्या जात असल्याचे पोलीस मित्राकडून समजले. डंबाळे यांनी तत्काळ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. पेठ पोलिसांनी कोहोर, करंजाळी परिसरातील सर्वच रस्त्यांवर नाकाबंदी करून सर्वच वाहनांची कोंडी केली.नाकाबंदी सुरु असल्याचे दिसताच मद्याची तस्करी करणाऱ्या संशयिता वाहनचालकांनी वाहने रस्त्यावर सोडून जंगलाच्या दिशेने पलायन केले. पोलीस पथकाने वाहनांची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा आढळून आला. ताब्यात घेतलेल्या वाहनांना चाव्या नसल्याने डस्टर कार (क्र . एमएच ०३ बीजे २४७९), इनोव्हा (क्र. जीजे ०५ सीएन१९०९), पजेरो (जीजे ०३ पीके ५४५५) या वाहनांना टोचन करून पेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याबाबत पेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणावर बेकायदा मद्यसाठा वाहतूक केला जात असून, तस्करांनी आता मुख्य रस्ते सोडून आडमार्गांची मदत घेतल्याचे दिसून येत आहे.
तीन वाहनांसह लाखोंचा मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 2:07 AM
पेठ : दमण येथून आलेल्या तीन वाहनांची पेठ पोलिसांनी झडती घेतली असता त्यात लाखोंचा बेकायदेशीर मद्यसाठा आढळून आला. पोलिसांनी वाहनांसह मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. दरम्यान वाहनचालक वाहन सोडून फरार झाले.
ठळक मुद्देपेठ तालुका : पोलीसांनी केली नाकाबंदी