नाशिक : तुमचे डेबिट कार्ड बंद पडले आहे, ओटीपी द्या, त्वरित सुरू करून देतो, असा वारंवार फोन करून एका संशयिताने बँक खात्यातील दोन लाख आठ हजार ७४६ रुपयांची रक्कम परस्पर काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार पंचवटीतील अमृतधाम परिसरात घडला आहे़ मुंबई-आग्रा महामार्गावरील विडी कामगारनगरमधील रहिवासी हनुमान विश्वकर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २१ जुलै २०१८ रोजी दुपारच्या सुमारास एका संशयिताने ९४४९९३६५४२ या मोबाइल क्रमांकावरून त्यांच्या ७०७६४१४०३५ यावर फोन केला़ संशयिताने बँकेतून बोलत असल्याचे सांगून तुमचे डेबिट कार्ड बंद झाले आहे़ मोबाइलवरील ओटीपी नंबर मला द्या मी पुन्हा सुरू करतो असे सांगितले़ त्यानुसार ओटीपी दिल्यानंतर बँक खात्यातून परस्पर परस्पर काढून घेतली.भद्रकालीत चौदा हजारांची लूटदुचाकीचालकावर काचकुयरी टाकून त्याच्याकडील चौदा हजार रुपये चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि़ १८) रात्रीच्या सुमारास भद्रकालीतील ठाकरे रोड परिसरात घडली़ मनोज तेली (गुलमोहर कॉलनी, आनंदनगर) यांचे भद्रकाली परिसरात न्यू फॅशन फूटवेअर हे दुकान आहे. रात्री आठ वाजेच्या सुमारास ते दुकान बंद करून घरी जाण्यासाठी दुचाकीवर बसले असता काही संशयितांनी त्यांच्यावर खाज निर्माण होणारी कायकुयरी टाकली़ त्यामुळे त्यांनी मागे वळून बघितले असता चोरट्यांनी त्यांच्या बॅगमधील १४ हजार रुपयांची रोकड व बँकेचे पासबुक चोरून नेले़