शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
इलॉन मस्क यांनी पुन्हा केलं चकित, स्टारशिप यानातून अवकाशात पाठवली केळी; केला अभूतपूर्व प्रयोग
7
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
8
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
9
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
10
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
11
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
12
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
13
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
14
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
15
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
17
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
18
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
19
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
20
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार

जलवाहिनीच्या गळतीमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 11:12 PM

सिडको : खोडे मळा परिसरातील नाल्याजवळील जलवाहिनीतून बारा तास झालेल्या पाण्याच्या गळतीमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे रात्रभर मोठ्या प्रमाणात वाहिलेल्या पाण्याने नजिकच्या शेताचे नुकसान झाल्याने परिसरात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

ठळक मुद्देखोडे मळा परिसर : बारा तास मनपाचे दुर्लक्ष

सिडको : खोडे मळा परिसरातील नाल्याजवळील जलवाहिनीतून बारा तास झालेल्या पाण्याच्या गळतीमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे रात्रभर मोठ्या प्रमाणात वाहिलेल्या पाण्याने नजिकच्या शेताचे नुकसान झाल्याने परिसरात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.सिडकोतील नाईक नगरपासून बडदेनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर खोडे मळा परिसरातील नाल्याजवळून जलवाहिनी गेलेली आहे. खोडे मळा परिसरातील नाल्याजवळ शनिवार (दि.४) रोजी रात्री ८ वाजेपासून अचानक जलवाहिनीतून पाण्याची गळती सुरु झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी जलवाहिनीतून धो-धो वाहणारे पाणी मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास आले. बरेच जण सदर प्रकार पाहून एकीकडे पाण्याच्या काटकसरीचे धोरण राबविणारी महानगरपालिका व दुसरीकडे पाण्याचा अपव्यय होत असतानाही निष्काळजीपणा करणारा पाणीपुरवठा विभाग यांना दुषणे देत निघून जात होते.

सदर बाब परिसरातील पत्रकारांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांच्याशी तत्काळ संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र सर्व नॉट रिचेबल येत होते. त्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्याशी संपर्क साधल्यावर अर्ध्या तासात महानगरपालिकेचे कर्मचारी आले आणि सव्वा आठ वाजता पाण्याचा अपव्यय थांबला. तोपर्यंत बारा तासात लाखो लिटर पाणी परिसरातील शेत आणि नाल्यातून वाया गेले होते. या प्रकाराबद्दल सिडको तसेच खोडे मळा परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.जलवाहिनी जेथून गेलेली आहे, त्या नाल्यालगतच माझी चहाची टपरी आहे. शनिवारी रात्री आठ वाजेपासून रविवार (दि.५) सकाळी सव्वा आठ वाजेपर्यंत जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. शनिवारी संध्याकाळी दोन जण या व्हॉल्व्हजवळ आले होते. ते गेल्यानंतर पाणी गळती सुरु झाली.- सूरज केंदळे, खोडे मळा. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाwater pollutionजल प्रदूषण