शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
2
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."
3
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
4
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
5
PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन....
6
video: ऑन ड्युटी पोलिस कॉन्स्टेबलला चिरडले, फरफटत नेले...उपचारादरम्यान मृत्यू
7
Ayushman Card : कोणत्या हॉस्पिटलमधून 'आयुष्मान भारत योजनेतून' मोफत उपचार होणार? जाणून घ्या प्रोसेस
8
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
9
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
10
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
11
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
12
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
13
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
14
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
15
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
16
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
17
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
18
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
19
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
20
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!

येवला तालुक्यात बनावट मूर्तीकारांकडून लाखोंचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 10:04 PM

येवला : गावामध्ये घराच्या दर्शनी भागात देवांच्या अथवा महापुरु षांच्या धातूंच्या मूर्ती ठेवण्याची अनेकांना हौस असते. या हौसेपोटी अनेक नागरिक एका मूर्तीसाठी हजारो रु पये मोजतात. परंतु याचा फायदा घेऊन तालुक्यातील गावामध्ये काही परप्रांतीय बनवत मूर्तीकाराकडून आपण मूर्तिकार असल्याचे भासवत अनेकांना लाखोंचा गंडा घातला आहे.

येवला तालुक्यातील अंदरसूल गारखेडा देवळणे,बोकटे आदी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना या भामट्यांनी शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबडेकर, आदी महापुरु षांच्या अथवा देवदेवतांच्या मूर्ती बाजार मूल्यापेक्षा कमी भावात घरपोहाच आणून देतो असे सांगून छापील जमापावती देत पोबारा केला आहे. भामट्यांनी अनेकांकडून थोडी थोडी रक्कम घेऊन लाखो रु पये गोळा केले. मात्र चार महिन्यांपासून गायब झालेल्या बनावट मूर्तीकारांकडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अनेकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली आहे. मात्र व्यक्तिगत रक्कम कमी असल्याने पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी कोणीही समोर येत नसल्यामुळे ते पोलिसांच्या जाळ्यात येत नाहीत.कोट...मला देखील अंदरसूल परिसरातील माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीचा फोटो दाखविण्यात आला. त्यामुळे मी ११ एप्रिल २०१८ रोजी पैसे दिले. मात्र तीन महिने उलटून गेले, तरी मूर्ती मिळाली नाही. पावतीवरील क्रमांकावर संपर्क केला असता तो बंद असल्याचे निदर्शनास आले. याबद्द्ल पोलिसात तक्र ार दाखल करणार आहोत.- अप्पासाहेब खैरनार, गारखेडा ता. येवलातालुक्याच्या शेजारील कोपरगाव भागात अशा प्रकारच्या घटना ऐकून होतो. मात्र येवला तालुक्यातदेखील असे फसवणुकीचे प्रकार होत असतील तर ही गंभीर बाब आहे. आतापर्यंत ज्या ग्राहकांची फसवणूक झाली आहे, त्यांनी पोलीस स्टेशनला लेखी तक्रार देण्यासाठी पुढे यावे, त्यानंतर पोलीस योग्य ती कार्यवाही करतील.- बाळासाहेब भापकर, पोलीस निरीक्षक, येवलाइन्फो ...अशी होते ग्रामस्थांची फसवणूकशीख धर्मियांच्या वेशातील दोन-तीन जणांनी गावात येऊन रेकी करतात. गावातील हौशी आणि प्रतिष्ठीत लोकांची माहिती घेतात. त्यापैकी एखाद्या व्यक्तीला विना आगावू रक्कम घेता मूर्ती बसवून देतात व त्यांच्या सोबत फोटो काढून परिसरातील इतर नागरिकांना दाखवतात. ते पाहून इतर नागरिक आगाऊ रक्कम देऊन बुकिंग करतात व काही दिवसात मूर्ती घरपोहोच आणून देतो असे सांगतात. तशी पावती देखील देतात. त्या पावतीवर पंजाब राज्यातील विविध गावांचे चुकीचे पत्ते व फोन क्रमांक असतात. मात्र ग्राहक त्या वेळी शहानिशा न करता पैसे देऊन टाकतात व मूर्ती येण्याची वाट पाहत बसतात. बराच अवधी उलटल्यानंतरही मूर्तीकार न आल्याने संबंधित ग्राहक पावतीवर दिलेल्या मोबाईलवर संपर्क साधतात, मात्र ते क्रमांक चुकीचे असतात. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे नागरिकांचे लक्षात येते, मात्र तोवर वेळ निघून गेलेली असते.

टॅग्स :Crimeगुन्हा