शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

अंतर्गत लेखा तपासणीवर लाखोंची उधळपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:54 AM

गणेश धुरी।नाशिक : आधीच नोटाबंदीच्या निर्णयानंतर आर्थिक गोत्यात आलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने संलग्न असलेल्या सहकारी संस्थेच्या सुमारे पाच हजाराहून अधिक सभासदांना गेल्या पंधरा वर्षांपासून लाभांश वाटप केलेला नाही. त्यांच्या ठेवींवरील लाखोंचे व्याजही डब्यात गेले आहे. दुसरीकडे सरकारी लेखा परीक्षण बंद झाल्यापासून खासगी अंतर्गत तपासणीवर दरवर्षी जिल्हा बॅँकेकडून लाखोंची उधळपट्टी ...

गणेश धुरी।नाशिक : आधीच नोटाबंदीच्या निर्णयानंतर आर्थिक गोत्यात आलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने संलग्न असलेल्या सहकारी संस्थेच्या सुमारे पाच हजाराहून अधिक सभासदांना गेल्या पंधरा वर्षांपासून लाभांश वाटप केलेला नाही. त्यांच्या ठेवींवरील लाखोंचे व्याजही डब्यात गेले आहे. दुसरीकडे सरकारी लेखा परीक्षण बंद झाल्यापासून खासगी अंतर्गत तपासणीवर दरवर्षी जिल्हा बॅँकेकडून लाखोंची उधळपट्टी सुरू असल्याचे धक्कादायक वृत्त आहे.मागील दोन वर्षांचा अंतर्गत लेखा परीक्षणाचा खर्च अनुक्रमे ५४ लाख व ५९ लाख आहे. वास्तविक पाहता शासन स्तरावरून खासगी अंतर्गत तपासणीसाठी २० लाखांची मर्यादा दिलेली आहे. मात्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचा नजिकच्या दोन वर्षांचा अंतर्गत लेखा परीक्षण तपासणीचा खर्च पाहिला तर तो एक कोटींच्या पुढे गेल्याचे समजते. अर्थातच २० लाखांची मर्यादा दोन्ही वर्षी बासनात गुंडाळून ठेवण्यात आल्याचे चित्र आहे. इतकेच नव्हे तर २००३-०४ पासून जिल्हा बॅँकेत सहकारी संस्थांचे कोट्यवधी रुपयांचे भाग भांडवल (शेअर्स) गुंतले आहे. हे भाग भांडवल जिल्हा बॅँक बिनव्याजी वापरत आहे. शिवाय सहकारी संस्थांच्या सुमारे ५ हजार ७३२ सभासदांच्या १८६ कोटींच्या ठेवी असून, त्याही बिनव्याजी वापरण्यास जिल्हा बॅँक मोकळी असल्याचा आरोप सभासदांनी केला आहे. शासनाच्या असलेल्या ३७ लाखांच्या ठेवींना व्याज द्यावे लागू नये, म्हणून जिल्हा बॅँकेने सन २०११-१२ या आर्थिक वर्षात शासनाची कोणतीही मागणी नसताना ३७ लाखांच्या ठेवी शासनाला परत केल्याचे समजते. म्हणजेच एकीकडे नोटाबंदीच्या नावाने गळे काढून बॅँकेची आर्थिक परिस्थिती खाल्यावल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे शासनाने दिलेल्या मर्यादा ओलांडून लाखोंची उधळपट्टी करायची, असा काहीसा प्रकार सुरू असल्याचे चित्र आहे.सन २००३-०४ पासून सरकारी लेखा परीक्षणावर झालेला खर्च पाहिला तर पहिल्या वर्षी सुमारे ३४ लाख, २००४-०५ सुमारे ३२ लाख, २००६-०७ सुमारे ३६ लाख, २००७-०८ सुमारे ४१ लाख, २००८-०९ ४५ लाख, त्यानंतर सरकारी लेखा परीक्षण बंद झाले. तेव्हापासून पुढे हा खर्च पन्नास लाखांच्या पुढेच गेला आहे.