देवळा : आठवडाभरापूर्वी देवळा तालुक्यात झालेल्या पावसामुळे बाजरी तसेच नवीन लागवड केलेल्या पोळ कांद्याचे व कांद्याच्या रोपांचे नुकसान झाले आहे. चाळीत साठवणूक केलेला उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणात सडू लागल्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.गत दोन वर्षांंपासून तोट्यात जाणाºया उन्हाळी कांद्याला यावर्षी बºयापैकी बाजारभाव असल्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला होता. मोठ्या अपेक्षेने शेतकºयांनी उन्हाळी कांदा चाळीत साठवून ठेवला होता. परंतु कांद्याच्या बाजारभावातील अस्थिरतेमुळे चाळीतील उन्हाळी कांदा विकण्यासंदर्भात शेतकरी संभ्रमात पडले होते. त्यातच सोशल मीडियावर कांद्याच्या बाजारभावासंदर्भात दररोज येणाºया वेगवेगळ्या पोस्टमुळे शेतकºयांच्या अपेक्षा वाढून तर संभ्रम अधिकच वाढला. अनेक शेतकºयांना कांदा विक्री करण्यासंदर्भात निश्चित निर्णय घेता आला नाही. मोठ्या अपेक्षेने चाळीत साठवणूक केलेला कांदा आता सडू लागला असून, काही शेतकºयांचा चाळीतील कांदा संपूर्ण सडल्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कांदा सडू लागल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आता चाळीत साठवणुक केलेला कांदा मोठ्या प्रमाणात विक्रीस आणू लागल्यामुळे बाजारात कांद्याची आवक वाढू लागली आहे.पावसामुळे नवीन लागवड केलेल्या पोळ कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक कांदा उत्पादक शेतकर्यांनी रब्बी हंगामासाठी उन्हाळी कांद्याचे बियाणे शेतात टाकले होते. पावसामुळे हि रोपे खराब झाली असुन ह्या शेतकर्यांना पुन्हा उन्हाळी कांद्याचे बियाणे उपलब्ध करावे लागणार आसल्याने त्यांना भुर्दंड बसणार आहे.तालुक्यातील सर्व नद्या नाल्यांना पाणी वाहत असुन एखादा अपवाद सोडला तर सर्व धरणे व पाझरतलाव पाण्याने ओव्हर फ्लो झाली आहेत. चणकापूूर उजव्या कालव्याला सोडलेल्या पुर पाण्यामुळे तालुक्याला चांगला लाभ झाला आहे. विहीरीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. रब्बी हंंगामासाठी शेतकर्यांना पाण्याची उपलब्धता झाली आहे.
कांदा सडू लागल्यामुळे लाखो रु पयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 11:19 PM