स्विटकॉर्न मका उत्पादक शेतक-यांना शिवसाई कंपनीकडून लाखोचा गंडा; शेतकरी संघटना आक्रमक
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : स्विटकॉर्न मका उत्पादक शेतकऱ्यांना स्विटकॉर्न मक्यावर प्रक्रिया करणाऱ्या विंचूर औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीने लाखोंचा गंडा घातला असल्याची तक्रार निफाडचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे शेतकरी संघटनेने एका निवेदनाद्वारे केली आहे.
आंध्रप्रदेशातील एका व्यक्तीने विंचूर, सिन्नर या ठिकाणी स्विटकॉर्न मका, कांदा यावर प्रक्रिया करणारा उद्योग सुरू केला असून, नासिक येथे कंपनीचे कार्यालय आहे. शेतकऱ्यांकडून मका खरेदी करायची आणि पंधरा-वीस दिवसांत विकलेल्या स्विटकॉर्न मक्याचे पैसे द्यायचे ,हे साधारण डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होते; परंतु जानेवारीच्या मध्यापासून एप्रिलपर्यंतचे साधारण ४० ते ४२ लाख रुपये शेतक-यांना मिळालेले नाहीत. लॉकडाऊनची सबब सांगत संबंधित कंपनीने चालढकल केली. मे महिन्यात मात्र कंपनीमालक फरार झाला असून, त्याने मोबाइल बंद केला असल्याचे सदर निवेदनात म्हटले आहे. संबंधित कंपनी मालकावर कारवाई करून शेतकऱ्यांना स्विटकॉर्न मक्याचे पैसे मिळवून द्यावे, अशी मागणी होत आहे.
इन्फो
...तर आंदोलन छेडणार!
संबंधित कंपनीने एका आठवड्यात शेतकऱ्यांचे पैसे न दिल्यास विंचूर औद्योगिक वसाहतसमोर नासिक- औरंगाबाद महामार्गावर शेतकरी रास्ता रोको आंदोलन करतील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे बापूसाहेब पगारे, भानुदास चव्हाण, संकेत आहेर, साहेबराव लभडे, संदीप जगदाळे, सोमनाथ संभेराव, अनिता गांगुर्डे, वंदना चौधरी, योगेश कोकाटे, बाळासाहेब गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो- १० येवला फार्मर
शेतकरी संघटनेच्यावतीने उपविभागीय कार्यालयात त्रिभुवन यांना निवेदन देताना पदाधिकारी व शेतकरी.
===Photopath===
100621\10nsk_36_10062021_13.jpg
===Caption===
फोटो- १० येवला फार्मर शेतकरी संघटनेच्यावतीने उपविभागीय कार्यालयात त्रिभुवन यांना निवेदन देतांना पदाधिकारी व शेतकरी.