नाशिक : पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाºया नायलॉन मांजामुळे पक्षी व प्राण्यांच्या जीवितास धोका पोहोचत असल्याने शासनाने विक्रीवर बंदी घातलेली असतानाही सर्रास या मांजाची विक्री करणाºया विक्रे त्यावर शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने छापा टाकला़ सराफ बाजारातील तांबोळी वाड्यात टाकण्यात आलेल्या या ठिकाणाहून एक लाख रुपयांचा मांजा जप्त केला असून, संशयित राजेंद्र तांबोळी या विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे सहायक पोलीस उपनिरीक्षक जाकीर शेख यांना सराफ बाजारात नायलॉन मांजाची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती़ वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद वाघ यांनी या माहितीची सत्यता पडताळून पाहिल्यानंतर सराफ बाजारातील तांबोळी वाड्यात सापळा रचून छापा टाकण्यात आला़ या ठिकाणी संशयित राजेंद्र सदाशिव तांबोळी यांचे तांबोळी पूजा-भांडारचे दुकान असून, येथूनच नायलॉन मांजाची विक्री सुरू होती. पोलिसांनी या ठिकाणाहून एक लाख ६५० रुपये किमतीचे २११ नायलॉन मांजा गुंडाळलेले गट्टू जप्त केले. नियम धाब्यावरपशु-पक्ष्यांसाठी जीवघेण्या ठरत असलेल्या या नायलॉन मांजाची निर्मिती व विक्रीस महाराष्ट्र शासनाने बंदी घातली आहे़ मात्र, असे असले तरी नायलॉन मांजाची चोरीछुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते़व्हॉट्स अॅपवरून विक्रीनायलॉन माजांच्या विक्रीची व्हॉट्स अॅपवरून जाहिरात करणारे संशयित आदित्य विलास भरीतकर (मखमलाबादरोड, पंचवटी, मूळ रा. रामेश्वरपूर, अकोले, जि. नगर) व रोहित सुधीर चिने (रा. विद्यानगर, मखमलाबादरोड, पंचवटी) या दोघांना २५ डिसेंबर रोजी भद्रकाली पोलिसांनी शिवाजी गार्डनच्या गेटजवळून ताब्यात घेतले होते़
लाखो रुपयांचा नायलॉन मांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 12:40 AM
नाशिक : पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाºया नायलॉन मांजामुळे पक्षी व प्राण्यांच्या जीवितास धोका पोहोचत असल्याने शासनाने विक्रीवर बंदी घातलेली असतानाही सर्रास या मांजाची विक्री करणाºया विक्रे त्यावर शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने छापा टाकला़ सराफ बाजारातील तांबोळी वाड्यात टाकण्यात आलेल्या या ठिकाणाहून एक लाख रुपयांचा मांजा जप्त केला असून, संशयित राजेंद्र तांबोळी या विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
ठळक मुद्दे नायलॉन मांजामुळे पक्षी व प्राण्यांच्या जीवितास धोका बंदी घातलेली असतानाही सर्रास या मांजाची विक्री