सातपूर : सातपूर औद्योगिक वसाहतीतील गोल्डी कंपनी शेजारील सीआरएन वुडन्स कंपनीला गुरुवारी रात्री लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे किमती वुडन्स जळून खाक झाले आहे.रात्री उशिरा पर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते.आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.सातपूर औद्योगिक वसाहतीतील (शिवाजीनगर जवळ) गोल्डी कंपनीच्या शेजारी फर्निचर बनविणारी सीआरएन वुडन्स कंपनी आहे.गुरुवारी रात्री सात वाजेच्या सुमारास या कंपनीला अचानक आग लागली.आग लागल्याचे समजताच सातपूर अग्निशमन दलाचे दोन बंब ताबडतोब घटनास्थळी रवाना झालेत.आगीचे रौद्ररूप पाहून नियंत्रण कक्षाला कळविण्यात आल्याने नियंत्रण कक्ष,सिडको येथील अग्निशमन दलाचे बंब मदतीला धावलेत.त्याचप्रमाणे बॉश आणि महिंद्र अँड महिंद्रचे बंब देखील आग विझविण्यासाठी घटनास्थळी दाखल झालेत.तसेच पोलिसांनी देखील धाव घेतली.कंपनीत सर्वत्र लाकडी साहित्य असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. सर्वत्र धुराचे लोट दिसत होते.आगीत लाखो रुपयांच्या फर्निचरचे,लाकडी साहित्य व अन्य साहित्य जळून खाक झाले आहे.अंधारातही रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात येत होते.आगीचे कारण समजू शकले नाही.
आगीत लाखो रुपयांचे किमती वुडन्स जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2020 9:15 PM
सातपूर : सातपूर औद्योगिक वसाहतीतील गोल्डी कंपनी शेजारील सीआरएन वुडन्स कंपनीला गुरुवारी रात्री लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे किमती वुडन्स जळून ...
ठळक मुद्देआगीचे कारण समजू शकले नाही.