nashikनाशिक : येस या खासगी बॅँकेत महापालिकेचे खाते असल्याने स्मार्ट सिटी कंपनीचे खाते याच बॅँकेत उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु सहा महिन्यांपूर्वी कंपनीच्या बैठकीत राष्टÑीयीकृत बॅँकेतच रक्कम ठेवावी, असा निर्णय झाला. त्यानुसार कंपनीने टप्प्याटप्प्याने पैसे काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे कंपनीची कमीत कमी रक्कम अडकली, परंतु दुसरीकडे मात्र या कंपनीत संचालकपदावर महापालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी असतानादेखील त्यांनी काळजी घेतली नाही त्यामुळे आज सव्वा तीनशे कोटी रुपये अडचणीत आले आहेत.रिझर्व्ह बॅँकेने दोन दिवसांपूर्वीच येस बॅँकेवर आर्थिक निर्बंध घातले आणि खातेदारांना अवघे ५० हजार रुपये देण्याची मुभा दिली, परंतु निर्बंधांमुळे महापालिकेचे सुमारे सव्वातीनशे कोटी रुपये अडकल्याने खळबळ उडाली आहे. स्मार्ट सिटी कंपनीचेदेखील १४ कोटी रुपये अडकले आहेत.
येस बँकेत अडकले कोट्यवधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2020 11:52 PM
नाशिक : येस या खासगी बॅँकेत महापालिकेचे खाते असल्याने स्मार्ट सिटी कंपनीचे खाते याच बॅँकेत उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु सहा महिन्यांपूर्वी कंपनीच्या बैठकीत राष्टÑीयीकृत बॅँकेतच रक्कम ठेवावी, असा निर्णय झाला. त्यानुसार कंपनीने टप्प्याटप्प्याने पैसे काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे कंपनीची कमीत कमी रक्कम अडकली, परंतु दुसरीकडे मात्र या कंपनीत संचालकपदावर महापालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी असतानादेखील त्यांनी काळजी घेतली नाही त्यामुळे आज सव्वा तीनशे कोटी रुपये अडचणीत आले आहेत.
ठळक मुद्देसव्वा तीनशे कोटी रुपये अडचणीत आले आहेत.