सिन्नर : कोरोनाने मित्राचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीला धावून आलेल्या वर्गमित्रांनी त्याच्या कुटुंबीयांना लाख मोलाची मदत केली. वर्गमित्रांनी पावणेतीन लाख रुपयांची मदत जमा करीत मित्राच्या कुटुंबीयांकडे सुपुर्द केली.
काही दिवसांपूर्वी शहरातील धनंजय गाडेकर या तरुणाचे कोरोनाने निधन झाले. येथील लोकनेते शं. बा. वाजे विद्यालयातील (पूर्वीचे जनता विद्यालय) १९९० च्या दहावीच्या बॅचच्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनी एकत्र येऊन धनंजय गाडेकर यांच्या कुटुंबीयांना २ लाख ७५ हजार रुपयांची मदत दिली. या निमित्ताने वर्गमित्राच्या कुटुंबाच्या मदतीला मैत्री धावून गेल्याचे दिसून आले.
धनंजय गाडेकर शांत, सुस्वभावी मित्र काेरोनाने मृत्यूमुखी पडला आणि त्याच्या कुटुंबावर संकट कोसळले. या दु:खातून सावरण्यासाठी वर्गमित्रांनी एकत्र येऊन त्याच्या कुटुंबीयांना मदतीचा हात दिला. कल्पतरु एंटरप्रायजेसचे संचालक संदीप ठोक, डॉ. दिलीप गुरुळे, डॉ. संजय चव्हाणके, नीलेश गमे, ज्ञानेश्वर घोलप, ज्ञानेश्वर घोरपडे, मधुकर गुळे, नवनाथ शिरसाट, संजय आव्हाड, दिलीप मुरकुटे, मनोज गुंजाळ, संजय लोखंडे, राजू चव्हाण आदींनी धनंजय यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांकडे ही मदत सुपुर्द केली.
-----------------
मित्रांचे सहकार्य
मदत निधी जमा करण्यासाठी संजय शिंदे, डॉ. धनंजय कदम, प्रकाश भट, गणेश म्हाळनकर, अनिल वाजे, नीलेश कुलथे, श्याम यादव, डॉ. स्मिता गवळी-घाटकर, सुवर्णा पाटील-बर्वे, मनीषा चौधरी-गायकवाड, निर्मला पेखळे-कांडेकर, डॉ. पल्लवी इंगळे, शिल्पा गुजराथी आदींसह वर्ग मित्रांचे सहकार्य लाभले.
----------------------
सिन्नर येथील मयत धनंजय गाडेकर यांच्या कुटुंबीयांना मदत सुपुर्द करताना वर्गमित्र. (१८ सिन्नर ३)
===Photopath===
180621\18nsk_17_18062021_13.jpg
===Caption===
१८ सिन्नर ३