नाशिक : शहरातील बांधकाम साईटवर मोठ्या प्रमाणावर गौणखनिजाचे बेकायदेशीर उत्खनन केले जात असल्याचा प्रत्यय खुद्द प्रभारी प्रांत अधिकाऱ्यांना आला. सकाळी सायकलवर मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या सोपान कासार यांनी शहरात मातीची विनापरवानगी वाहतूक करणाºया दोन मालट्रक पाठलाग करून पकडले असून, त्यांना जागेवरच दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बांधकाम साईटवर गौणखनिजाचे उत्खनन केले जात असल्याने त्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी अधिकृत परवानगी घेतली किंवा नाही यासाठी पंचनामे करण्याचे आदेश तलाठ्यांना देण्यात आले आहेत. नाशिकचे प्रभारी प्रांत सोपान कासार हे शुक्रवारी सकाळी मॉर्निंग वॉक करून सायकलीने घरी परतत असताना कॅनडा कॉर्नरकडून त्यांना भरधाव वेगाने जाणारा एक मालट्रक दिसला, त्यात निश्चित गौणखनिज असावे, अशा संशयाने त्यांनी मालट्रकचा पाठलाग सुरू केल्यावर डॉ. काकतकर यांच्या हॉस्पिटलजवळ त्यांनी ट्रक अडविला. चालकाला विचारपूस केली असता त्याने शहरातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या साईटवरील तळमजल्याच्या उत्खननातून काढलेली माती नेत असल्याचे सांगितले. पहिल्या ट्रकचालकाची विचारपूस सुरू असतानाच दुसरा ट्रकही या ठिकाणी येऊन पोहोचला व त्यातही मातीच असल्याचे पाहून तत्काळ तलाठ्यांना पाचारण करून पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले. नाशिक शहरात अनेक ठिकाणी इमारतींची कामे सुरू असून, पाया खोदकाम, तळमजल्यासाठी उत्खनन केले जात असून, त्यातील गौणखनिजाचे बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे. त्यासाठी कोणतीही रॉयल्टी भरली जात नाही. नियमानुसार बांधकाम व्यावसायिकांनी उत्खननाची परवानगी घेतानाच किती गौणखनिजाचे उत्खनन करणार त्या प्रमाणात रॉयल्टी भरणे आवश्यक आहे, परंतु त्याचे पालन होत नसल्याने आता शहरातील सर्व बांधकाम साईटवर जाऊन तलाठ्यांमार्फत पंचनामे करण्याचे ठरविण्यात आले आहे. प्रत्येक साईटवर जाऊन बांधकाम व्यावसायिकाने केलेल्या उत्खननाच्या तुलनेत रॉयल्टी आकारण्यात येणार आहे.
गौणखनिज चोरी : शहरातील बांधकामांचे होणार पंचनामे सायकलवर पाठलाग करून प्रांताने ट्रक पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 1:09 AM
नाशिक : शहरातील बांधकाम साईटवर मोठ्या प्रमाणावर गौणखनिजाचे बेकायदेशीर उत्खनन केले जात असल्याचा प्रत्यय खुद्द प्रभारी प्रांत अधिकाऱ्यांना आला.
ठळक मुद्देबांधकाम साईटवर गौणखनिजाचे उत्खनन केले डॉ. काकतकर यांच्या हॉस्पिटलजवळ त्यांनी ट्रक अडविला