अजंग रावळगाव औद्योगिक वसाहतीसाठी संपादीत केलेली शेती महामंडळाची साडेआठशे एकर जमीन तसेच काष्टी शिवारातील शेती महामंडळाची हजार एकर जमीन हे मालेगाव तालुक्याला वरदान ठरणारे दोन महत्वकांक्षी प्रकल्प असून चाळीसगाव फाट्यावरील औद्योगिक वसाहतीनंतर अजंग रावळगाव औद्योगिक वसाहतीत बेरोजगार तरुणांना काम मिळणार आहे. रोजगार निर्मितीमुळे या भागाचा नक्कीच कायापालट होईल असा आशावादही यावेळी भुसे यांनी व्यक्त केला. वडनेर, खाकुर्डी, अजंग व वडेल ग्रामपंचायतीमार्फत भुसे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.यावेळी भुसे यांच्या सोबत गटविकास अधिकारी पिंगळे, तालुका कृषी अधिकारी गोकुळ अहिरे यांच्यासह तहसिल कार्यालयातील अधिकारी, वीज मंडळ, महसुल विभाग, पाणलोट विभाग, ग्रामविकास अधिकारी आदि अधिकारी उपस्थित होते. यावेळी वडनेर, खाकुर्डी, कोठरे, विराणे, चिंचवे, वळवाडे, अजंग, वडेल, पिंपळगाव, टिपे, संतनगर, डाबली आदि गावातील ग्रामस्थांनी मांडलेल्या प्रश्नांना ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांनी संबंधित अधिका-यांकडून उत्तरे मिळवून दिली.
ग्रामविकास राज्यमंत्र्यांनी घेतला दुष्काळी परिस्थितीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 5:36 PM